Seed Production
Seed ProductionAgrowon

Seed Production : ‘वनामकृवि’चे खरिपात तेराशे हेक्टरवर पैदासकार बीजोत्पादन

Kharif Season : १ हजार ३४२. ८५ हेक्टरवर १३ पिकांच्या ४५ वाणांचा पैदासकार बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्यापासून १३ हजार क्विंटलवर पैदासकार बियाणे (ब्रीडर सीड) उत्पादनाचे उद्दिष्ट आहे.
Published on

Parbhani News : या वर्षीच्या २०२४-२५ खरीप हंगामात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विविध ठिकाणच्या प्रक्षेत्रावर १ हजार ३४२. ८५ हेक्टरवर १३ पिकांच्या ४५ वाणांचा पैदासकार बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्यापासून १३ हजार क्विंटलवर पैदासकार बियाणे (ब्रीडर सीड) उत्पादनाचे उद्दिष्ट आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध पिकांच्या वाणांचे बियाणे शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावे यासाठी कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा यांच्या नेतृत्वात विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील अनेक वर्षांपासून पडीक जमीन विहितीखाली आणली जात आहे. त्यामुळे यंदा खरीप बीजोत्पादन क्षेत्रात सुमारे ४०० हेक्टरने वाढ झाली आहे.

Seed Production
Crop Seed Production : मक्तापूरच्या ‘पसायदान’ची बीजोत्पादनात भरारी

यंदा विद्यापीठाने विकसित केलेल्या सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कपाशी, बाजरी, भुईमूग, सूर्यफूल, तीळ, भात ही ११ पिके व भेंडी, मिरची भाजीपाला पिके तसेच भरडधान्ये पिकांचा मिळून एकूण ४५ वाणांचा १ हजार ३४२.८५ हेक्टरवर पैदासकार बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येत आहे.

त्यात विद्यापीठाच्या परभणी येथील मध्यवर्ती प्रक्षेत्र तसेच संशोधन केंद्र, संशोधन प्रकल्प मिळून एकूण २२ प्रक्षेत्रांवर १ हजार ५७.२५ हेक्टर आणि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, बदनापूर (जि. जालना), खामगाव, धाराशिव, तुळजापूर, लातूर, सोमनाथपूर (जि. लातूर), अंबाजोगाई, नांदेड, वसमत, गोळेगाव (जि. हिंगोली) या ठिकाणचे संशोधन केंद्र, महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्रांच्या मिळून एकूण २७ प्रक्षेत्रावर २८५. ६० हेक्टरवर बीजोत्पादन घेण्यात येत आहे.

Seed Production
Seed Production : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे दोन हजार एकरांवर बीजोत्पादन

विद्यापीठाचे पैदासकार बियाण्याचा मागणीनुसार महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ, शेतकरी उत्पादक कंपन्यांना पुरवठा केला जातो. महाबीज, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या बिजोत्पादन कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना पायाभूत व प्रमाणित बियाणे उपलब्ध होते. विद्यापीठाकडून सत्यतादर्शक बियाण्याची विक्री केली जाते, अशी माहिती सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. एच. व्ही. काळपांडे यांनी दिली.

वनामकृवि खरीप बीजोत्पादन स्थिती (क्षेत्र हेक्टर, उद्दिष्ट क्विंटलमध्ये)

पीक वाणांची संख्या क्षेत्र बियाणे उत्पादन उद्दिष्ट

सोयाबीन ०७ १०३०.३५ १०३०३.५०

तूर ०६ २१२.०५ २१२०.५०

मूग ०२ २५.०० १५०.००

उडीद ०१ १.०० १.००

कपाशी ०८ २२.३५ १३४.५०

बाजरी ०४ ४.८० ४८.००

भुईमूग ०२ १.०० ८.००

सूर्यफूल ०४ ५.०० १५.००

तीळ ०१ २.०० १०.००

भात ०४ १.४० ३४.००

भेंडी ०१ १.०० १.००

मिरची ०२ १.५० १.५०

मिलेट ०३ ३५.४० १७७.००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com