Water Policy Debate: राज्यातील शेतकरी पिके वाचविण्यासाठी धडपडत असताना त्यांच्यावर उपसा बंदी लादत परराज्यात पाणी सोडणे कितपत योग्य आहे..नचा तिसरा आठवडा संपत आला तरी राज्यात पावसाचा पत्ता नाही. पावसाच्या पाण्यावरील पेरण्या खोळंबल्या आहेत. या वर्षीच्या खरिपाबाबत शेतकऱ्यांमध्ये आधीच चिंतेचे वातावरण आहे. अशाही परिस्थितीमध्ये पाण्याची सोय असलेल्या काही शेतकऱ्यांनी सोयाबीन, भुईमूग, ऊस, हळद, भात, भाजीपाला या पिकांच्या लागवडी केल्या आहेत. पावसाला विलंब होत असल्याने सिंचनाच्या पाण्यावर ही पिके वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. .Water Withdrawal Ban: दूधगंगा पाणी उपसाबंदी दोन दिवसांसाठी स्थगित.परंतु पाटबंधारे विभागाची अडेलतट्टू भूमिका त्यांच्या या प्रयत्नांवर पाणी फेरण्याचे काम करते आहे. पावसाने ओढ दिल्याने जलसाठ्यांवर ताण निर्माण झाला असे कारण पुढे करत कोल्हापूर पाटबंधारे विभागाने नद्यांमधून शेतीसाठी होणाऱ्या पाणी उपशावर बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शेतकरी किंवा संस्थेचा पाणी उपसा परवाना रद्द करण्यात येत आहे. विद्युतपंप व इतर सिंचन साहित्य जप्तीचे देखील आदेश देण्यात आले आहेत. शेतीपंपाचा विद्युत पुरवठा फ्यूज काढून खंडीत करण्यात येत आहे. .धरणातून शेतीसाठी देण्यात येणारे पाणी बंदीचे आदेश जलसंपदामंत्र्यांनी यापूर्वीच काढले आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये पिके वाचविण्यासाठी धडपड करीत असलेल्या शेतकऱ्यांची अशी कोंडी करणे कितपत योग्य आहे, यावर गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे. त्यामुळे तंत्र आणि शास्त्र या दोन्ही बाबी विभागातून लुप्त झाल्या आहेत..Pollution Control: प्रदूषण नियंत्रित करण्याचे ‘महानंद’ला आदेश.२०१८ मध्ये विहिरीच्या खोलीची मर्यादा ६० मीटर ठेवून अधिसूचित न केलेल्या खोल विहिरीच्या उपशासाठी सामान्य कराच्या दुप्पट व अधिसूचित (पुनर्भरणापेक्षा उपसा जास्त असल्याचे जाहीर झालेल्या) क्षेत्रातल्या खोल (६० मीटरपेक्षा खोल) विहिरीच्या उपशासाठी साधारण कराच्या चौपट कर लावण्याचा पराक्रमदेखील या राज्यात झाला होता. कोल्हापूर जिल्हा हा बारमाही बागायती आहे. या जिल्ह्यातील सुमारे १ लाख १८ हजार हेक्टर उसापैकी ६० ते ७० हजार हेक्टर क्षेत्र नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. तसेच सुमारे २० हजार हेक्टर क्षेत्रावरील धान्य व कडधान्य पिकांनाही या निर्णयाचा फटका बसणार आहे. .अपेक्षित पाऊस न झाल्यास अशा प्रकारच्या आडमुठ्या भूमिकेने भात, भुईमूग, सोयाबीन आदी पिकांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. पंचगंगा, भोगावती, दूधगंगा, वारणा, तुळशी, कासारी, कडवी, कुंभी तसेच धामणी-जांभळी या कोल्हापूर जिल्ह्यातील बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. नद्यांचे पाणी डोळ्यादेखत वाहून जात असताना तेथील शेतकरी पिकांना देऊन पिके वाचवू शकत नाहीत, हे त्यांच्यासाठी मोठी दुर्दैवी बाब आहे. टंचाई काळात पिण्यासाठी पाणी जरूर राखून ठेवले पाहिजे. परंतु कोल्हापूर जिल्ह्यात उपसा बंदी लागू करून कर्नाटकला पाणी सोडण्यात येत असल्याचा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केला आहे. .या भागातील नद्या, धरणात पाणीसाठा आहे, बंधाऱ्यांजवळ नद्या वाहत आहेत, शेतकरी पिके वाचविण्यासाठी पाण्याची मागणी करीत आहेत. अशा वेळी परराज्यांत पाणी सोडणे योग्य नाही. उपसा बंदीसह फ्यूज काढून वीजपुरवठा खंडीत करण्याच्या आदेशाचा पुनर्विचार व्हायला हवा. नियोजनकर्ते आणि राज्यकर्त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की जलसंपदा विभागाची प्रचलित रचना, कार्यपद्धती आणि विचारधारा सुद्धा पूर्णतः कालबाह्य झाली आहे. बदलत्या काळातील आव्हाने पेलण्याची कुवत या विभागात थोडीफारही राहिली नाही. संपूर्ण विभागाच्या फेररचनेची हीच वेळ आहे. पाणी वापराचे नियम व कायदे हे शेतकरी सुसंगत करावे लागणार आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.