Kadaknath poultry
Kadaknath poultry  Agrowon
ॲग्रो विशेष

Kadaknath Poultry : मध्यप्रदेश सरकार देतेय कडकनाथ कुक्कुटपालनासाठी अर्थसहाय्य

Team Agrowon

गेल्या काही वर्षात शहरी भागात कडकनाथ कोंबडीची मागणी वाढत आहे. कडकनाथ कोंबडीचे मांस आणि अंडी इतर कोंबड्या आणि अंड्यांपेक्षा जास्त महाग आहे. एक अंडे सुमारे ३० रुपयांना तर चिकन ९०० ते ११०० रुपये किलोने मिळते. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकार कडकनाथ कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कडकनाथ कोंबडीची वाढती मागणी लक्षात घेऊन आदिवासी महिलांसाठी कडकनाथ संगोपन युनिट उभारण्यासाठी मदत करत आहे. ज्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसरा टप्पा सुरू झाला आहे. 

मध्य प्रदेश सरकार सुमारे एक लाख रुपये खर्च करून कडकनाथ कुक्कुटपालनासाठी लाभार्थ्यांना शेड बांधकाम, भांडी, धान्य, १०० पिल्ले व तांत्रिक ज्ञान उपलब्ध करून देत आहे. लसीकरणानंतर ही २८ दिवसांची पिल्ले लाभार्थ्यांना दिली जात आहेत. यामुळे त्यांचा मृत्युदर कमी होतो आणि नुकसान कमी होते. कडकनाथ कोंबड्यांची विक्री झाली नाही तर पशुसंवर्धन विभागामार्फत अंडी आणि कोंबड्यांची खरेदी केली जाईल. ज्यामुळे लाभार्थ्याचे कोणतेही नुकसान होत नाही. 

पहिल्या टप्प्यात ३१० महिलांना योजनेचा लाभ 

पहिल्या टप्प्यात मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात १०६, अलिराजपूरमध्ये ८७ आणि बरवानी जिल्ह्यात ११७ महिला आदिवासी लाभार्थींनी कडकनाथ संगोपन सुरू केले आहे. या जिल्ह्यांमध्ये १०×१७ आकाराचे शेड, भांडी, ६ महिन्यांपर्यंतचे धान्य, लस टोचलेली ५० पिल्ले कुक्कुटपालन विकास महामंडळाकडून लाभार्थ्यांना देण्यात आली आहेत. झाबुआमध्ये आता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. कडकनाथ कुक्कुटपालन योजनेअंतर्गत सतना जिल्ह्यातील गोबरनाव काला, पिठोराबाद, धनेह, जिगंहत, बंदी, मोहर आणि नरहाटी या आदिवासीबहुल गावात आदिवासी महिलांसाठी ३० कडकनाथ पोल्ट्री युनिट उभारण्यात आले आहेत. त्यांना पहिल्या टप्प्यात ४० कडकनाथ पिल्ले आणि कोंबड्यांसाठी ५८ किलो खाद्य देण्यात आले आहे.  

काय आहेत कडकनाथ कोंबडीची वैशिष्टे?

कडकनाथ कोंबडीची त्वचा, पंख, मांस, रक्त हे सर्व काळे असते. मांसामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असल्यामुळे हृदयरोग आणि मधुमेही रुग्णांसाठी कडकनाथ कोंबडीचे मांस फायदेशीर मानले जाते. या सर्व गुणधर्मांमुळे कडकनाश कोंबड्याचे मांस आणि अंडी इतर कोंबड्यांच्या मांस आणि अंड्यांच्या तुलनेत खूप महाग आहे. एक अंडे सुमारे ३० रुपयांना तर चिकन ९०० ते ११०० रुपये किलोने मिळते. 

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT