Satara News : महाबळेश्वर सारख्या दुर्गम तालुक्यामध्ये नैसर्गिक मधाचा एक ब्रँड निर्माण होत आहे. मधाच्या या ब्रँडचे नाव ‘मधुसागर’ असे असून, तो सध्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून बाजारपेठेत विकला जात आहे. दुर्गम भागातील शेतकरी व बचत गटाच्या महिलांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम आणखी पुढे नेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पर्यटन, उद्योग, आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी काढले.
मंत्री नाईक हे येथे दौऱ्यावर होते. त्यावेळी मधाचे संग्रहालय व विक्री केंद्रास आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयास भेट दिली. या वेळी तहसीलदार तेजस्विनी खोचरे-पाटील, विशाल जाधव, तलाठी सागर शिंदे, कर्मचारी उपस्थित होते.
मध उद्योगास चालना मिळावी म्हणून स्थापन केलेल्या मध संचालनालयाच्या कार्यालयासही त्यांनी भेट दिली. या वेळी मध उत्पादन, मध विक्री व मध संकलन यासंबंधी माहिती घेतली. मधासंदर्भात स्थानिक व्यवसाय व स्थानिक उत्पादनाची माहिती घेऊन व्यवसायिकांना प्रोत्साहन दिले. राज्यातील ग्रामीण उद्योगांना चालना देणाऱ्या आणि स्थानिक कारागिरांना बळ देण्यासाठी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ स्थापन केले आहे. या मंडळाच्या येथील प्रादेशिक कार्यालयाला भेट दिली. या वेळी खादी आणि ग्रामीण उद्योगातून बनलेल्या वस्तूंच्या उत्पादनाची माहिती घेतली.
गेल्या अनेक वर्षांपासून मधमाशी पालन कशा प्रकारे केले जात आहे, मधमाशी पालन आणि त्याचे महत्त्व, तसेच हा उद्योग रोजगार निर्मितीस चालना देणारा उत्पन्नाचा स्रोत कसा बनू शकतो, यावर नाईक यांनी चर्चा केली. मधमाशी पालनात मधमाशांच्या विविध प्रजातींची माहितीही त्यांनी सांगितली.
लेबलिंग करणाऱ्या केंद्राला भेट
मंत्री नाईक यांनी प्रत्यक्ष जंगल भागात नेऊन मधमाश्यांची कृत्रिम पोळी बनविण्यासाठी मधमाशी पालनाच्या पेट्या दाखविण्यात आल्या. ही पोळी कशी तयार होतात, कामगार माशा जवळपासच्या दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावरील जंगलांमधून मध गोळा करून पेट्यांमध्ये कशा परततात, मधाचे शुद्धीकरण कशा प्रकारे केले जाते, कच्च्या मधातील आर्द्रतेचा अंश कसा काढून टाकला जातो, हे त्यांनी पाहिले. मधाचे पॅकेजिंग आणि लेबलिंग करणाऱ्या केंद्राला भेट देऊन पॅकेजिंगचा शेवटचा टप्पाही पाहिला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.