Lumpy Skin Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Lumpy Skin Disease: राज्यात ‘लम्पी स्कीन’ पुन्हा डोके वर काढतोय

Maharashtra Livestock Alert: राज्यात लम्पी स्कीन आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, पुणे, सातारा, परभणी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही पशुधनांना या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले आहे.

गणेश कोरे

Pune News: पशुधनांमध्ये थैमान घालणारा ‘लम्पी स्कीन’ आजार राज्यात पुन्हा डोके वर काढतो आहे. पुणे, सातारा, परभणी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांतील पशुधनांना लागण झाली असून, त्यांना लसीकरण केले गेले आहे. असे असले तरी पशुसंवर्धन विभागाकडे मात्र अद्याप एकाही पशुधनाला लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला नसल्याचे पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.

गेल्या काही वर्षांपासून राज्यात लम्पी स्कीनने पशुधन बेजार झाले आहेत. साथीच्या काळात लसीकरण करून, साथ आटोक्यात आणण्याचे प्रयत्न झाले. मात्र आजाराचे समूळ उच्चाटन झाले नसल्याचे समोर येत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पशुधनाची रोगप्रतिकारक क्षमता वाढीसाठी आणि कोणत्याही आजाराची लागण होऊ नये यासाठी विविध लसीकरणाची मोहीम सुरू असल्याचे पशुसंवर्धन आयुक्तालयाद्वारे सांगण्यात येत आहे. विदर्भ, मराठवाड्यातील गाव खेड्यातील पशुधनाला बाधा झाल्याचे समोर येत आहे.

पुणे जिल्ह्यातील खोडद (ता. जुन्नर) येथील २३, सातारा जिल्‍ह्यात ५२, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७० पशुधनांना बाधा झाल्याचे समोर आले आहे. परभणी जिल्ह्यातील वझूर गावातील (ता. पूर्णा) पशुवैद्यकीय दवाखानाअंतर्गत वझूर, दगडवाडी, इटलापूर येथील ३ पशुधनांना ‘लम्पी’चा प्रादुर्भाव झाला असल्याचे समोर आले आहे. यावर तातडीने लसीकरण मोहीम सुरू आहे. त्यावर ‘प्रादुर्भाव विरळ आहे,’ असे वझूरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव राठोड यांनी सांगितले

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लम्पी स्कीन सदृश आजाराचा ७० हून अधिक जनावरांना प्रादुर्भाव झाला आहे. त्यापैकी ५० पेक्षा अधिक जनावरे पूर्णपणे बरी झाली असून, उर्वरित जनावरांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पाच ते सहा जनावरांमध्ये ही लक्षणे दिसून आली आहेत. आतापर्यंत पशुसंवर्धन विभागाच्या आकडेवारीनुसार सत्तरच्या जवळपास जनावरांना प्रादुर्भाव झाला होता.

दोन वर्षांपूर्वी पशुधनांमध्ये या आजाराची गंभीर लक्षणे होती. या वर्षी मात्र दिसून आली नाहीत. उलट सर्वसाधारण उपचाराने जनावरे पूर्णपणे बरी झाली आहेत. तर उर्वरित जनावरे देखील चांगला प्रतिसाद देत आहेत. पशुसंवर्धन विभागाने लसीकरणासारख्या उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. याशिवाय आजाराचे निश्‍चितीकरणाच्या दृष्टीने वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंमलबजावणी सुरू असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

नागपूर जिल्ह्यात एकही पशुधन बाधित नसल्याचा दावा

नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वगळता गोंदिया जिल्ह्यांत एखादे जनावर प्रादुर्भावग्रस्त आढळून येते, उर्वरित ठिकाणी याची संख्या नगण्य आहे. अमरावती विभागातील अकोला, वाशीम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ या पाचही जिल्ह्यांत प्रादुर्भावग्रस्त जनावरे नसल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाने केला आहे. गोंदिया जिल्ह्यात एखादे प्रादुर्भावग्रस्त पशुधन आढळून येत असल्याने व प्रतिबंधात्मक उपायांवर भर देण्यात आला आहे. विभागातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील निरीक्षणात सातत्य असून पशुपालकांना देखील गोठ्याची स्वच्छता राखण्यास सांगण्यात आले आहे. गोठ्यांमध्ये नियमित फवारणी करण्यासारखे उपाय केले जात असल्याचे प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्‍त डॉ. सतीश राजू यांनी सांगितले.

दीड कोटी लसींचे वाटप

लम्पी स्कीन होऊ नये, यासाठी खबरदारी पशुसंवर्धन विभागाने घेतली आहे. यासाठीचे नियोजन करण्यात आले असून, प्रत्येक पशुधनाला लस देण्यासाठी सुमारे दीड कोटी लसमात्रा सर्व जिल्हे आणि तालुक्यांना पाठविण्यात आले असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी सांगितले. तर ज्या ठिकाणी बाधा असल्याचे निदर्शनास येईल त्या पशुधनांच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अहवाल आल्यानंतरच लागण झाल्याचे सांगितले जाईल, असेही डॉ. देवरे यांनी सांगितले.

पावसाळा सुरू असून, पशुधन आजारी पडणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन आयुक्तांनी केले आहे. एखादे पशुधन अशक्त, आजारी ताप आलेले असल्यास तातडीने स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगून लम्पी स्कीनचे लसीकरण करून घेण्यात यावे. तसेच आजारी पशुधनाला इतरांपासून वेगळे आणि निरीक्षणाखाली ठेवावे, असेही सांगण्यात आले आहे.

लम्पी स्कीनसदृश आजाराचा साधारणपणे ४० ते ७० जनावरांना प्रादुर्भाव झाला आहे. एकही जनावर दगावलेले नाही किंवा गंभीर आजारी देखील नाहीत. जिल्ह्यात कोणतीही गंभीर स्थिती नाही. लम्पी स्कीन संदर्भात वरिष्ठांकडून मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही सुरू आहे.
डॉ. समीर बिलोले, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, सिंधुदुर्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Issue: तरुण शेतकऱ्याने विविध मागण्यांसाठी घेतली नदीत उडी; शेतकरी बेपत्ता,प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू

Wildlife Terror : खरिपात वाघासोबत हत्तींची दहशत

Nanded Fertilizer Scam : जैविक खतांच्या थेट विक्रीप्रकरणी चौकशी सुरू

Viksit Bharat Scheme: तरुणांना १५ रुपये बोनस देणार; १ लाख कोटींची विकासित भारत योजना आजपासून सुरु

Fishing Season : नव्या हंगामात दर्यातून मासळीचे घबाड

SCROLL FOR NEXT