Dharashiv News: धाराशिव जिल्हा परिषदेचे स्वउत्पन्नातून तयार करण्यात आलेले २०२५-२६ या वर्षाचे सुधारित तसेच २०२६-२७ या वर्षाचे मूळ अंदाजपत्रक गुरुवारी (ता. १२) झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आले. एकूण २६ कोटी ९२ लाख ७२ हजार ९७० रुपयांच्या या अंदाजपत्रकात पायाभूत सुविधांसह शिक्षण, आरोग्य आणि महिला कल्याणाशी संबंधित विविध नावीन्यपूर्ण योजनांना प्राधान्य देण्यात आले आहे..मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक डॉ. मैनांक घोष यांनी या अंदाजपत्रकास मंजुरी दिली. मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन इगे यांनी हे अंदाजपत्रक प्रशासकांसमोर सादर केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे, प्रकल्प संचालक अनुप शेंगुलवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व खातेप्रमुख उपस्थित होते. .Infrastructure Development: पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांची गतीने उभारणी करा.अर्थसंकल्पात सर्वाधिक ४७.३९ टक्के तरतूद पंचायत राज कार्यक्रम विभागासाठी करण्यात आली आहे. पंचायत राज कार्यक्रमासाठी १२ कोटी ७६ लाख १२ हजार ९७० रुपये, सार्वजनिक मालमत्ता परिरक्षण (बांधकाम) विभागासाठी चार कोटी ५५ लाख ३९ हजार रुपये, आरोग्य विभागासाठी दोन कोटी आठ लाख दोन हजार रुपये, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागासाठी एक कोटी २३ लाख दोन हजार रुपये तर शिक्षण विभागासाठी ९४ लाख २६ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. .Chana Procurment : हरभरा हमीभावासाठी ई-समृद्धीवर नोंदणी कशी करावी?.याशिवाय कृषी विभागासाठी ८५ लाख ४० हजार रुपये आणि पशुसंवर्धन विभागासाठी ७४ लाख नऊ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यंदाच्या अंदाजपत्रकात विविध नावीन्यपूर्ण योजनांवर विशेष भर देण्यात आला आहे. जिल्हा स्तरावरील उत्कृष्ट शाळांचा सत्कार, विज्ञान प्रदर्शन व स्पर्धा परीक्षा केंद्रांसाठी पुस्तके उपलब्ध करून देणे, आशा स्वयंसेविकांना विमा कवच देणे तसेच आशा क्लिनिक सुरू करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना सायकल देण्यासाठी चार लाख ९७ हजार रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे..सौर विद्युतीकरणासाठी तरतूदजिल्हा परिषदेत ई-गव्हर्नन्स, आयटी सेल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरासाठी ४० लाख रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. जिल्हा परिषद इमारतीच्या सौर विद्युतीकरणासाठी २० लाख रुपये ठेवण्यात आले आहेत. सामाजिक दायित्व योजनांसाठीही समाजकल्याण, दिव्यांग कल्याण, महिला व बालकल्याण तसेच ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.