Lumpy Skin Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Lumpy Skin Disease: सिंधुदुर्गाला ‘लम्पी’चा विळखा

Livestock Disease: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’मुळे आतापर्यंत ६०० जनावरांना प्रादुर्भाव झाला असून, ८ जनावरे दगावली आहेत. लम्पीचा विळखा अधिक घट्ट होत असल्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे.

एकनाथ पवार / ॲग्रोवन वृत्तसेवा

Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’मुळे आतापर्यंत ६०० जनावरांना प्रादुर्भाव झाला असून, ८ जनावरे दगावली आहेत. लम्पीचा विळखा अधिक घट्ट होत असल्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे.

जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव सुरू झाला होता. परंतु पशुसंर्वधन विभागाने त्याबाबत गुप्तता पाळली होती. मात्र जुलैमध्ये प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला. जिल्ह्यातील मालवण, कुडाळ, देवगड, वेंगुर्ला, सावंतवाडी या तालुक्यांमध्ये अधिक प्रादुर्भाव होता.

परंतु त्यानंतर कणकवली, वैभववाडी आणि देवगड तालुक्यांत प्रादुर्भाव वाढू लागला. जिल्ह्यात आतापर्यंत ६०० जनावरे बाधित झाली असून, त्यापैकी ८ जनावरे दगावली आहेत. ४१८ जनावरांवर उपचार झाले आहेत. सध्या १७४ जनावरांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात लम्पी स्कीन सुरू होण्यापूर्वीच ७२ हजार जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. उर्वरित जनावरांना लसीकरण सुरू आहे. अधिकतर जनावरे बरी होत आहेत. पशुपालकांनी लक्षणे दिसताच तातडीने पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा.
डॉ. समीर बिलोलीकर, सहायक उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, सिंधुदुर्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chat GPT: चॅटजीपीटीचं पाचवं व्हर्जन लॉंच; उत्तर मिळणार अचूक, ओपन एआयचा दावा

Sugarcane Payment : ऊसबिले न देताच दिल्याचा अहवाल, कुर्मदास कारखान्याविरोधात तक्रार

Rain Deficit : पावसाची तूट पिकांच्या मुळांवर, कोरडवाहू शेतीपुढे संकट

Kharif Crop : सोलापूर जिल्ह्यात खरीप पिके पावसाने तरली

Jaltara Project : स्वयंसेवी संस्थांनी दिला जलतारा प्रकल्पाला आधार

SCROLL FOR NEXT