Satara Lumpy Outbreak agrowon
ॲग्रो विशेष

Satara Lumpy Outbreak : सातारा जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव, २५० जनावरांना लागण, २ जनावरे दगावली

Lumpy Skin : खबरदारी म्हणून जिल्हा पशुसंवर्धन विभाग लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती उपाययोजना करत असूनही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

sandeep Shirguppe

Satara Animal Husbandary Department : मागच्या दोन वर्षांत हाहाकार माजवलेल्या लम्पी आजाराने सातारा जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. साताऱ्यात सध्या २५० हून जनावरांना याची लागण झाली आहे तर दोन जनावरांचा मृत्यू झाला आहे. याबाबत तातडीने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे.

याबाबत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जनावरांच्या गोठ्यात गोमाशा, डास यांचा शिरकाव होऊ नये, याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. बाधित जनावरे अन्य जनावरांच्या कळपात सोडू नयेत. प्रसंगी गोचीड, गोमांशी निर्मूलनासाठी औषध फवारणी करावी. लम्पीसदृश लक्षणे दिसल्यास तत्काळ पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. पवार यांनी केले आहे.

सातारा जिल्ह्यात मागील वर्षी जनावरांचा कोरोना म्हणून समजल्या जाणाऱ्या लम्पी रोगाने मोठ्या प्रमाणात जनावरे दगावली होती. यावर खबरदारी म्हणून जिल्हा पशुसंवर्धन विभाग लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती उपाययोजना करत असूनही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. जिल्ह्यात लसीकरणाची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

मात्र, मागच्या दोन आठवड्यात लम्पीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. जावळी व वाई तालुक्यात प्रत्येकी एका जनावराचा लम्पीने मृत्यू झाला असून, कोरेगाव, फलटण, खंडाळा, वाई, जावळी या पाच तालुक्यांत २५१ बाधित जनावरे आढळून आली आहेत. लम्पीचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पशुसंवर्धन विभागाकडून युद्धपातळीवर जनावरांचे लसीकरण करण्यात येत असून, दोन लाख ७८ हजार ८१ जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.

लक्षणे ओळखून उपाययोजना

बाधित जनावरांना ताप येणे, चारा खाण्याचे प्रमाण कमी होणे, अंगावर ठिकठिकाणी गाठी येणे अशी लक्षणे दिसून आली आहेत. बाधित जनावरांवर तत्काळ उपचार करण्यात येत असून, लागण झालेल्या जनावरांच्या ठिकाणापासून पाच किलोमीटर परिसरातील जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात जास्तीतजास्त जनावरांचे लसीकरण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने उपाययोजना केल्या आहेत. संबंधित ठिकाणी जंतुनाशक फवारणीही करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT