E Peek Survey Agrowon
ॲग्रो विशेष

E-Peek Pahani : ई-पीक पाहणीला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद

Server Issue : अॅप सर्व्हर डाऊनमुळे कार्यरत होत नसल्याची स्थिती आहे. परिणामी ई-पीक पाहणीदेखील ठप्प आहे.

Team Agrowon

Jalgaon News : शेतकऱ्यांनाच आपल्या पीक पेरणीचा अधिकार देण्यासंबंधी ई-पीक पाहणी उपक्रम सुरू आहे. पण यास खरिपाच्या सुरुवातीस कमी प्रतिसाद मिळत आहे. तसेच अॅप सर्व्हर डाऊनमुळे कार्यरत होत नसल्याची स्थिती आहे. परिणामी ई-पीक पाहणीदेखील ठप्प आहे.

मागील दोन वर्षे ई-पीक पाहणीबाबत शेतकऱ्यांत नाराजीच आहे. तसेच या प्रक्रियेतील त्रुटीही कायम आहेत. सध्या केळी लागवड सुरू आहे. काही भागांत केळी लागवड आटोपली आहे. पूर्वहंगामी कापूस लागवड पूर्ण झाली आहे. परंतु या लागवडीच्या नोंदी ऑनलाइन किंवा सात-बारावर दिसत नसल्याची स्थिती आहे.

ई-पीक पाहणी स्मार्ट फोनच्या मदतीने ई-पीक पाहणी अॅपवरून करावी लागते. रब्बी हंगामातील पीक पेऱ्यांबाबत अनेक शेतकऱ्यांना नोंदणी करायची आहे. परंतु ही नोंदणी करताना नेटवर्क, डाटा हवा असतो. स्मार्ट फोन अनेकांकडे नाहीत. यामुळे पेरा नोंदणीस कमी प्रतिसाद मिळत आहे.

अनेक शेतकऱ्यांनी आपल्या मोबाइलमध्ये अॅप डाऊनलोड केले आहे. त्यांचा खाते क्रमांक व चार अंकी सांकेतांक आहे. हा खाते क्रमांक व सांकेतांकची नोंद केल्यानंतर अॅप सुरू होते. पुढे पीक पाहणीसंबंधी कार्यवाही होते. परंतु अॅप सांकेतांक नोंदणी केल्यावरही कार्यरत होत नाही, अशाही तक्रारी आहेत. शेतकरी याबाबत तांत्रिक समस्या घेऊन तलााठी कार्यालयात जात आहेत. परंतु तलाठी याबाबत दुरुस्ती किंवा इतर कार्यवाहीबाबत असमर्थता दाखवित आहेत. यासंबंधीची कार्यवाही प्रशासनातील संबंधित करू शकतात. परंतु दुरुस्तीच होत नसल्याने पीक पाहणीची नोंद अॅपवर होत नसल्याची स्थिती आहे.

रब्बी हंगाम निम्मा पूर्ण झाला आहे. खरिपातील पेरणी सुरू झाली आहे. काहींनी पेरणी नोंदविली, परंतु पेरा नोंद अद्याप उताऱ्यावर दिसत नाही, असेही काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कृषी विभागाची मदत पेरणीसंबंधीच्या आकड्यांबाबत महसूल प्रशासनास घ्यावी लागत आहे. ई-पीक पाहणीसंबंधीचे काम महाआयटीच्या पुणे येथील कार्यालयातून हाताळले जाते. यातच कुठेही ई-पीक पाहणीसंबंधी अधिकृत अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT