Soybean Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Rate : चांगल्या दर्जाचेही सोयाबीन कवडीमोल

Soybean Market : हमीदरापेक्षा एक हजार रुपयांनी कमी दर : उत्पादकांचे कंबरडे मोडल

Team Agrowon

Nanded News : नांदेड : चांगल्या दर्जाचे (एफएक्यू) सोयाबीनला सध्या बाजार समित्यांसह खेडा खरेदीत कवडीमोल दर मिळत आहेत. शासनाच्या हमी दरापेक्षा आठशे ते एक हजार रुपये दराने सोयाबीनची विक्री होत आहे. पडलेल्या दरामुळे अधीच अडचणीत असलेल्या सोयाबीन उत्पादकांचे मात्र कंबरडे मोडले आहे.

नांदेड जिल्ह्यात खरिपामध्ये तब्बल साडेचार लाख हेक्टरवर सोयाबीनचे पीक घेतले जाते. शेतकऱ्यांचे अर्थकारण ज्या पिकावर अवलंबून असते त्या सोयाबीनच्या पडलेल्या दराने मात्र शेतकऱ्यांची वाताहत होत आहे.

नवे सोयाबीन बाजारात आल्यानंतर त्यात ओलावा (मॉईश्‍चर) असल्याचे कारण देत बाजार समित्या तसेच खेडा खरेदीत व्यापाऱ्यांकडून दरात कपात करण्यात आली. परंतु सध्या सोयाबीनमध्ये ओलाव्याचे प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. सोयाबीनचा दर्जाही चांगला (एफएक्यू) असला तरी दरात मात्र वाढ होताना दिसत नाही. दिवाळीत खर्चाची जुळवाजुळव करण्यासाठी अनेकांनी इलाज नसल्यामुळे सोयाबीन विक्रीसाठी काढले.

परंतु व्यापाऱ्यांनी मात्र या संधीचा फायदा घेऊन मनमानी दराने सोयाबीनची खरेदी केली. सध्या जिल्ह्यातील तेल उत्पादक कंपन्यांसह बाजार समित्या व खेडा खरेदीत सध्या सोयाबीनला कमाल ४२५०, किमान ३७०० तर सरासरी ४१०० रुपये दर देत आहेत. हा दर केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किमतीपेक्षा आठशे ते एक हजार रुपये कमी आहे.

असे असले तरी शासकीय यंत्रणा मात्र चांगल्या दर्जाच्या शेतीमालाला कमी दर देऊन शेतकऱ्यांच्या होणाऱ्या लुटीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. सोयाबीनच्या दरातील घट, कापणीचे वाढलेले दर, सोयाबीनचा घटलेल्या उतारा तसेच रब्बीत खतांसोबत केले जाणारे लिंकिंग यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

Plant Nutrition: अन्नद्रव्ये पिकांना कशी मिळतात?

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

SCROLL FOR NEXT