Onion Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Rate : कांद्याची आवक कमी; तरी भाव खालीच

Onion Market : मागील दोन महिन्यांतील ही सर्वांत कमी आवक आहे. तरीदेखील कांद्याचे दर गडगडलेलेच असल्याची स्थिती बाजारात पाहायला मिळाली.

Team Agrowon

Solapur News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता. २५) ३९२ गाड्या कांद्याची आवक झाली होती. मागील दोन महिन्यांतील ही सर्वांत कमी आवक आहे. तरीदेखील कांद्याचे दर गडगडलेलेच असल्याची स्थिती बाजारात पाहायला मिळाली. सरासरी दर सोळाशे रुपये तर सर्वाधिक दर अवघ्या चार क्विंटलला तीन हजार ४०० रुपये मिळाला.

डिसेंबरच्या सुरुवातीला सोलापूर बाजार समितीत एकाच दिवशी तब्बल साडेतेराशे ते चौदाशे गाड्या कांदा आवक झाला होता. ६ डिसेंबरपासून काही दिवस अशीच स्थिती होती. त्यावेळी बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांचा विचार न करता एक दिवसाआड लिलाव करण्याचा निर्णय घेतला.

पण, माध्यमांसह शेतकऱ्यांनी अशा प्रकाराला कडाडून विरोध केल्यानंतर सभापती आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यावर तोडगा काढला. सध्या बाजार समितीत कांद्याचे दररोज लिलाव होत आहेत.

पण, मागील काही दिवसांत आवक- कमी जास्त होत असून सोमवारी मागील दीड-दोन महिन्यातील सर्वात निच्चांकी आवक सोलापूर बाजार समितीत झाल्याची नोंद झाली. कांदा निर्यात बंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आवक वाढली किंवा कमी झाली तरीदेखील भाव गडगडलेलेच असल्याची वस्तुस्थिती आहे.

सर्वाधिक दरामागे नेमके गुपित काय?

बाजार समितीत एकूण आवक झालेला कांदा साडेसहाशे ते चारशे गाड्या आहे. त्यात सर्वाधिक कांदा सरासरी चौदाशे ते सोळाशे रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होतो. पण, चार-पाच क्विंटल कांद्याला तीन हजार २०० ते तीन हजार ४०० रुपयांचा भाव मिळाल्याचा गवगवा बाजार समितीकडून केला जातो.

शेतकऱ्यांनी कांदा बाजार समितीत आणावा हा जाणीवपूर्वक हेतू त्यामागे असल्याची चर्चा आहे. सोमवारी ३९ हजार २६१ क्विंटल कांद्याला सरासरी भाव सोळाशे रुपयांचा मिळाला. तर अवघ्या चार क्विंटलला तीन हजार ४०० रुपयांचा दर मिळाल्याचे बाजार समितीच्या अहवालात नमूद आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT