Onion Export Ban : कांदा निर्यातबंदीमुळे बाराशे कोटींचा फटका ; भरपाईची मागणी

Onion Farmer Compensation : राज्यातील शेतकऱ्यांना निर्यातबंदीनंतर जवळपास १२०० कोटींचा फटका बसला आहे. त्यामुळे सरकारने कांदा निर्यातबंदी तत्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
Onion
Onion Agrowon
Published on
Updated on

Pune News : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्यानंतर भाव क्विंटलमागे २ हजार रुपयांनी कमी झाले. याचा निर्यातबंदीनंतर बाजार समित्यांमध्ये आणि थेट व्यापाऱ्यांना कांदा विकलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना जवळपास १२०० कोटींचा फटका बसला आहे. त्यामुळे सरकारने कांदा निर्यातबंदी तत्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

केंद्र सरकारने ७ डिसेंबर रोजी कांद्यावर अचानक निर्यातबंदी लावली. विशेष म्हणजे नेमके याच काळात खरिपातील कांद्याची आवक वाढ जाऊन भावही कमी होत होते. पण सरकारने कोणतीही पूर्वसूचना न देता निर्यातबंदी केल्याने कांदा बाजार विस्कळित झाला. याचा सर्वाधिक फटका बसला तो कांदा उत्पादकांना. कारण कांद्याचे भाव पाहता पाहता निम्म्यावर आले.

कांदा निर्यातबंदीच्या आधी बाजारात कांदा सरासरी ३ हजार ५०० ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटलने विकला जात होता. मात्र निर्यातबंदीनंतर कांद्याचे भाव सरासरी १ हजार ५०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान आले. म्हणजेच कांद्याचे भाव क्विंटलमागे तब्बल २ हजार रुपयांनी पडले.

Onion
Onion Export Ban : कांदा निर्यातबंदी प्रश्नी जानेवारीत एल्गार मेळावा

शेतकरी कांद्याची विक्री बाजार समित्या आणि थेट खळ्यावरूनही करत असतात. निर्यातबंदीनंतर राज्यातील बाजार समित्यांमध्ये तब्बल ४३ लाख क्विंटल म्हणजेच ४ लाख ३० हजार टन कांदा बाजारात आला. तर जवळपास १ लाख ७० हजार टन म्हणजेच १७ लाख क्विंटल कांदा थेट खळ्यांवरून विक्री झाला किंवा या कांद्याची नोंद बाजारात झाली नाही,

असे व्यापारी आणि शेतकऱ्यांनी सांगितले. म्हणजेच ८ डिसेंबर ते २५ डिसेंबर या काळात राज्यातील बाजारांत जवळपास ६ लाख टन म्हणजेच ६० लाख क्विंटल कांद्याची विक्री झाली. क्विंटलमागे २ हजार अर्थात टनामागे २० हजारांचा शेतकऱ्यांना भाव पडल्याने फटका बसला. निर्यातबंदीनंतर १७ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना तब्बल १२०० कोटींचा फटका बसला आहे.

बाजारातील कांदा आवक

६० लाख क्विंटल

भावातील घट

२ हजार रुपये

एकूण फटका

१२०० कोटी

Onion
Onion Ban Export : कांदा निर्यात बंदीचा शेतकऱ्यांना एक हजार कोटींचा फटका

बाजार समित्यांमध्ये झालेली कांदा आवक (क्विंटलमध्ये)

दिनांक---आवक

८ डिसेंबर---१,७५,२१०

९ डिसेंबर---२,०७,५६७

१० डिसेंबर---१,१३,२६०

११ डिसेंबर---२,३६,१९४

१२ डिसेंबर---२,५२,४३५

१३ डिसेंबर---२,९०,६१०

१४ डिसेंबर---२,२८,४१२

१५ डिसेंबर---२,८७,९८७

१६ डिसेंबर---२,४६,१५०

१७ डिसेंबर---८२,६८९

१८ डिसेंबर---४,२७,२२५

१९ डिसेंबर---३,३०,७६२

२० डिसेंबर---३,८०,३४९

२१ डिसेंबर---३,३०,५२२

२२ डिसेंबर---३,२८,४९९

२३ डिसेंबर---२,१८,४१२

२४ डिसेंबर---४७,००७

२५ डिसेंबर---२८,६२५

निर्यातबंदीनंतर कांदा भावात क्विंटलमागे सरासरी २ हजार रुपयांची घट झाली. सरकारने अचानक निर्यातबंदी करण्याऐवजी आधी पूर्वसूचना देणे आवश्यक होते. पुढील काळात इतर राज्यातीलही कांदा आवक वाढेल.
खंडूकाका देवरे, अध्यक्ष, नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशन.
निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. कांद्याचा उत्पादन खर्च वाढलेला असतानाही कमी भावात शेतकऱ्यांना कांदा विकावा लागत आहे. शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर निर्यातबंदी तत्काळ मागे घेणे हाच पर्याय आहे.
मधूकर मोरे, कांदा उत्पादक, सटाणा, जि. नाशिक.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com