Pankaja Munde Agrowon
ॲग्रो विशेष

Clean Rivers Mission: राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी दीर्घकालीन आराखडा तयार

Pankaja Munde: नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी दीर्घकालीन आराखडा तयार करण्यात आला असून, तो लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला जाईल, अशी माहिती पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

Team Agrowon

Nashik News: नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी दीर्घकालीन आराखडा तयार करण्यात आला असून, तो लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला जाईल, अशी माहिती पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

नाशिक दौऱ्यावर असलेल्या मंत्री मुंडे यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी प्रदूषण नियंत्रणासाठी ग्रामविकास, नगरविकास आणि जलसंपदा विभागांमध्ये समन्वयाची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी ग्रामविकास, नगरविकास आणि जलसंपदा विभागात समन्वय अत्यावश्यक आहे.त्यासाठी सविस्तर आराखडा तयार केला असून, लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सादर केला जाईल. या प्रकल्पांतर्गत पुढील १५ वर्षांचे नियोजन करून नदी पुनरुज्जीवनाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंडे म्हणाल्या, की पर्यावरण राक्षणासाठी मुंबईसह इतर शहरे व महामार्गांवरील विकासकामांसाठी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांमध्येही हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी ठोस उपाययोजना अनिवार्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ‘क्रेडाई’ नाशिकने घेतलेल्या ‘ग्रीन नाशिक’च्या पुढाकाराला शासनस्तरावरही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने मल शुद्धीकरण प्रकल्प

नाशिकमधून वाहणाऱ्या नद्यांमध्ये सोडले जाणारे सांडपाणी ही एक गंभीर समस्या आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मलशुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) उभारण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. तसेच हे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी विभागामार्फत विशेष लक्ष दिले जात आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवरही पर्यावरणाशी संबंधित उपाययोजनांवर गांभीर्याने काम सुरू असल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Rate : देशात सोयाबीनचे दर वाढण्याचे संकेत

Maharashtra Rains : राज्यातील काही भागात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर; २४ तासांत १० जणांचा मृत्यू, जाणून घ्या कुठे कुठे पाऊस?

Bhima River Crisis : भीमेचे अश्रू

Palm Cultivation : बांबूसोबत पाम लागवडीचा पर्याय विचाराधीन

Farmer Flood Relief : सरकारने वेळकाढूपणा करू नये

SCROLL FOR NEXT