River Conservation : समुदायाच्या सहभागातून वाचेल विदर्भातील नद्यांचे अस्तित्व

Nadi Sanvad : नदीमित्र विदर्भ शाखा आणि संगीत सूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पवनार येथील धाम नदीच्या किनारी ‘नदी संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
River Conservation
River Conservation Agrowon
Published on
Updated on

Wardha News : नदीमित्र विदर्भ शाखा आणि संगीत सूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पवनार येथील धाम नदीच्या किनारी ‘नदी संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात विदर्भातील नद्यांचे संवर्धन, त्यांचा सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरणीय संतुलन यावर सखोल चर्चा झाली. कार्यक्रमात प्रमुख वक्ते नदीमित्र प्रा. ओमप्रकाश भारती यांनी सांगितले, की वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, धाम, नाग, यशोदा आणि पेंच या नद्या विदर्भाच्या जीवनवाहिनी आहेत.

या नद्या केवळ पिण्याचे पाणी व सिंचन पुरवीत नाहीत, तर त्या विदर्भाच्या सांस्कृतिक आणि आर्थिक वाटचालीचाही अविभाज्य भाग आहेत. मात्र, औद्योगिक कचरा, सांडपाणी, अवैध वाळू उपसा, अति जलउपसा आणि जंगलतोड यांमुळे या नद्या गंभीर संकटात आहेत.

River Conservation
River Conservation : कासाडी नदीच्या संवर्धनासाठी १७ कोटींचा निधी

कार्यक्रमाचे संयोजन संगीत सूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष आणि हिंदी विद्यापीठातील प्रा. डॉ. सतीश पावडे यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण संवर्धन आणि सांस्कृतिक जतन यामध्ये एक सर्जनशील समन्वय साधण्यात आला.

River Conservation
River Conservation : सूक्ष्मजीवांनी केले आयाड नदीचे पुनरुज्जीवन

कार्यक्रमात विशाल इंगोले, वैभव निखाडे, रत्नेश साहू, स्वेच्छा, अमीषा, रूपम, राहुल यादव, विष्णू कुमार, मुरली, दीपक, गौरव, रितेश आणि गोविंद कुमार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रा. भारती यांनी सुचविलेले उपाय

प्रगत सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची उभारणी.

अवैध वाळू उपशावर कठोर कारवाई.

पर्जन्यजल संधारणाचे प्रयत्न.

वनीकरण आणि शाश्वत जलव्यवस्थापन धोरणांची अंमलबजावणी.

स्थानिक समुदायांचा सक्रिय सहभाग.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com