Long Vehicle Queues Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Procurement Center: सोयाबीन खरेदी केंद्रांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Long Vehicle Queues Issue: केंद्र शासनाच्या हमीभावानुसार सुरू झालेल्या शासकीय सोयाबीन खरेदीची मुदत ३१ जानेवारीला संपत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणलेल्या वाहनांच्या रांगा खरेदी केंद्रांवर मोठ्या संख्येने लागल्या आहेत.

कृष्णा जोमेगावकर

Nanded News: केंद्र शासनाच्या हमीभावानुसार सुरू झालेल्या शासकीय सोयाबीन खरेदीची मुदत ३१ जानेवारीला संपत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणलेल्या वाहनांच्या रांगा खरेदी केंद्रांवर मोठ्या संख्येने लागल्या आहेत. आगामी दोन दिवसांत सोयाबीन खरेदी होणे शक्य नसल्याने खरेदीची मुदत वाढविण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

सोयाबीनला बाजारात दर नसल्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाच्या खरेदी केंद्रावर देण्यासाठी विक्रीपूर्व नोंदणी केली. जिल्ह्यात एनसीसीएफ या केंद्रीय एजन्सीकडून पणन, व्हीसीएमएफ व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या राज्यस्तरीय एजन्सीकडून नांदेड जिल्ह्यात ३५ ठिकाणी सोयाबीनचे किमान हमीदर खरेदी केंद्र सुरू केले.

सोयाबीन खरेदीसाठी शेतकरी नोंदणी १ ऑक्टोबरपासून सुरू झाली. या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीपूर्व नोंदणी केली. १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई, दी विदर्भ सहकारी पणन महासंघ, नागपूर, दी विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनद्वारे तीन अशा यंत्रणाकडून जिल्ह्यात ३५ पेक्षा अधिक खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदी होत आहे.

दरम्यान, खरेदीसाठी १५ जानेवारीपर्यंत मुदत होती. यात वाढ करून ३१ जानेवारी अंतिम मुदत दिली आहे. परंतु या कालावधीत अर्ध्यापेक्षाही अधिक शेतकऱ्यांचे सोयाबीन केंद्रावर टाकणे शिल्लक आहे. खरेदीची मुदत संपत जवळ आल्याने अनेक खरेदी केंद्रावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अनेक खरेदी केंद्रावर शेतकरी आठ-आठ दिवस मुक्कामी आहेत. खरेदी केंद्रावरून शासनाच्या गोडाउनला सोयाबीन पोहोचविणाऱ्या गाड्यांच्याही रांगा लागल्या आहेत. यामुळे खरेदी केंद्र चालकांना लवकर गाड्या मिळत नाहीत. परिणामी, शेतकऱ्यांचा मालाचे वजन होत नाहीत.

आठ दिवसांपासून सोयाबीन विक्रीसाठी काट्यावर आणले आहे. परंतु वजन होत नाही. शासनाने सोयाबीन खरेदीची मुदत एक महिन्यापर्यंत वाढवी.
कोंडीबा जाधव, सातेगाव, ता. नायगाव
खरेदी केंद्रावर आलेल्या शेतकऱ्यांचा मालाचे वजन घेतले जात आहे. केंद्रावरून शासकीय वेअर हाउसला गेलेल्या गाड्या लवकर खाली होत नाहीत. यामुळे खरेदीला प्रक्रिया प्रभावित झाली आहे. यासाठी खरेदीला मुदतवाढ आवश्यक आहे.
अनिल सुंकेवाड, संचालक, शासकीय हमीभाव खरेदी केंद्र, घुंगराळा ता. नायगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parliament Winter Session 2025: 'मनरेगा'चे नाव बदलण्यावरुन विरोधक आक्रमक, संसद परिसरात सलग दुसऱ्या दिवशी निदर्शने

Kardai Mava Kid: करडईवरील काळ्या माव्याचं नियंत्रण कसं कराल?

Animal Health Care: मोबाइल पशुवैद्यकीय रुग्णवाहिका ठरतेय फायदेशीर

Hapus Mango Butter: हापूसच्या कोयींपासून तेल अन् मँगो बटर

Climate Crisis: करे कोई, भरे कोई...!

SCROLL FOR NEXT