Long March Agrowon
ॲग्रो विशेष

Long March : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले ‘लाल वादळ’

Long March Update : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व आदिवासींच्या विविध संघटनांच्या वतीने नाशिक मुंबई लाँग मार्चचे प्रणेते व माजी आमदार कॉ. जे. पी. गावीत यांच्या नेतृत्वाखाली लाँग मार्च काढण्यात आला.

Team Agrowon

Nashik News : राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात आहे. तसेच शासकीय, निमशासकीय मानधनावरील व कंत्राटी कर्मचारी यांच्याकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधून प्रमुख मागण्या मान्य करून घेण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व आदिवासींच्या विविध संघटनांच्या वतीने नाशिक मुंबई लाँग मार्चचे प्रणेते व माजी आमदार कॉ. जे. पी. गावीत यांच्या नेतृत्वाखाली लाँग मार्च काढण्यात आला. शेतकरी, कष्टकरी हजारोंच्या संख्येने सोमवारी (ता. २६) नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून शेतकरी व कर्मचाऱ्यांनी या विराट शेतकरी लाँग मार्च व महामुक्काम अंदोलनात प्रचंड संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील १५ तालुक्यांतून २५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग आहे. ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महामुक्काम करणार आहेत.

२०२३ मध्ये शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मागण्यांसाठी पायी लाँग मार्च काढला होता. त्या वेळी सरकारने हे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले; मात्र फक्त शब्द दिला, अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे या सरकारने फसवणूक केली आहे.

सरकारने हवा तेवढा वेळ घ्यावा, आम्ही शिधा पाणी घेऊन मुक्कामी आलो आहोत. आम्ही इथेच थांबणार आहोत, निर्धाराने आलोय आता मागे हटणार नाही, अशी प्रतिक्रिया माजी आमदार जेपी गावित यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT