Interim Budget Maharashtra 2024 : अंतरिम अर्थसंकल्पात 'लेक लाडकी योजने'साठी विशेष तरतूद?

Lek Ladki Yojana 2024 : राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणांचा पाऊस पाडला आहे. यावेळी त्यांनी अनेक नव्या कामांसह सध्याच्या सुरू असणाऱ्या योजनांसाठीही विशेष तरतूद करण्यात आल्याचे म्हटले आहे.
Interim Budget Maharashtra 2024
Interim Budget Maharashtra 2024Agrowon
Published on
Updated on

Pune News : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प आज मंगळवारी (२७ रोजी) सादर केला. मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना १ एप्रिल २०२३ पासून सुरू करण्यात आली असून ती अशीच सुरू ठेवण्यात येईल. त्याचबोरबर या योजनेचा लाभ मुलींना मिळावा म्हणून यात विशेष तरतूद करण्यात आल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. 

अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२३ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेक लाडकी योजना सुरू केली होती. मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना अधिक सक्षम करण्यात येणार असल्याचे अजित पवार म्हणाले. 

Interim Budget Maharashtra 2024
Interim Budget Maharashtra : कोल्हापूर आणि सांगली पूर रोखण्यासाठी राज्य अर्थसंकल्पात घोषणा

या योजनेतून मुलगी जन्माला आल्यापासून ती सज्ञान होईपर्यंत सरकारकडून आर्थिक मदत केली जाणार आहे. तर त्या मुलीला वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत टप्या टप्याने १ लाख १ हजार देण्यात येतील, असाही दावा अजित पवारांनी केला आहे. 

Interim Budget Maharashtra 2024
Budget Maharashtra 2024 : राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार सौर कुंपणासाठी अनुदान; अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा

राज्यात मुलीच्या जन्मानंतर या योजनेद्वारे ५००० रुपये देण्यात येणार आहेत. तर मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर मुलीला रोख ७५ हजार रुपये देण्यात येतील, अशीही घोषणा अजित पवारांनी केली. 

कधी कधी मिळणार पैसे? 

मुलगीच्या जन्मनंतर ५००० रुपये

मुलगी पहिलीत गेल्यावर ६००० रुपये

मुलगी सहावीत गेल्यावर ७००० रुपये

कधी कधी मिळणार पैसे?

मुलगी अकरावीत गेल्यावर ८००० रुपये

असे तिला ११ वी पर्यंत २५००० रूपये मिळणार आहेत.

तर मुलगी १८ वर्षांची झाल्यावर तिला ७५००० रूपये राज्य सरकार देणार 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com