Farmer Long March : शेतकऱ्यांच्या ‘लाँग मार्च’ची सुरगाण्यातून सुरुवात

Long March Update : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे माजी आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता. २१) ‘लाँग मार्च’ सुरगाणा तालुक्यातून निघाला.
Long March
Long MarchAgrowon

Nashik News : केंद्र व राज्य सरकारकडे अनेकदा मागण्या करूनही शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. या मुद्द्यावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे माजी आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता. २१) ‘लाँग मार्च’ सुरगाणा तालुक्यातून निघाला. यामध्ये पहिल्याच दिवशी १००० आदिवासी शेतकरी सहभागी झाले.

हा मोर्चा सोमवारी (ता. २६) नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या वेळी महामुक्काम व गावित यांच्यासह शेतकरी बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील १५ तालुक्यांतून ७ मार्गांद्वारे आंदोलक सहभागी होत आहेत.

Long March
Gram Swacchata Abhiyan : ग्राम स्वच्छता अभियानाच्या तपासणीची गैरहजरी भोवली

जिल्ह्यातील शेतकरी व कर्मचाऱ्यांनी शेतकरी लाँग मार्च व महामुक्काम आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व सर्व आदिवासी संघटनांनी केले आहे. त्यानुसार या मोर्चाने सुरगाण्यातून नाशिककडे कूच केली. अनेक गावांतून आंदोलक या पायी लाँग मार्चमध्ये सहभागी होत आहेत.

Long March
Sugarcane Farmers : साहेब जळालेल्या उसाचं चिपाड झालं आता तरी तोडा, शेतकऱ्यांची आर्त हाक

...या आहेत मागण्या

कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित किमान २ हजार रुपये भाव निश्चित करून कांदा निर्यातबंदी तत्काळ उठवावी, चार हेक्टरपर्यंतची वन जमीन कसणाऱ्यांच्या नावे करावी, शेतीला लागणारी वीज सलग २४ तास द्यावी, शेतकऱ्यांची थकित वीजबिले माफ करावीत. २००५ नंतर भरती झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करून कंत्राटी नोकरभरती बंद करा,

सरळ सेवाभरती पूर्वीप्रमाणे करा, पंतप्रधान आवास योजना व शबरी घरकुल योजनांचे अनुदान १ लाख ४० हजारांवरून पाच लाख करा व वंचित गरीब लाभार्थ्यांचा नवीन सर्व्हे करून त्यांची नावे ‘ड’च्या प्रतीक्षा यादीत समाविष्ट करावीत, आदी मागण्यांसाठी सोमवारी (ता. २६) सायंकाळी पाचपर्यंत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचावे, असे आवाहन गावित यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com