Grampanchayat Election
Grampanchayat Election Agrowon
ॲग्रो विशेष

Gram Panchayat Election : नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत स्थानिक नेत्यांनी गड राखले

Team Agrowon

Nagar News : नगर जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आणि मतमोजणी सोमवारी (ता.६) त्या-त्या तालुक्यात पार पडली. काही तालुक्याचे अपवाद वगळता त्या-त्या तालुक्यातील स्थानिक नेत्यांनी आपापल्या तालुक्यात सत्ता कायम ठेवली. विजय उमेदवारांनी निकालानंतर जल्लोष केला. राहता तालुक्यात मात्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताब्यातून दोन ग्रामपंचायत निसटल्या.

जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतींमधील सदस्यपदाच्या १ हजार ७०१ जागांसाठी ७ हजार २६० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. माघारीनंतर प्रत्यक्षात ३ हजार ९९५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे, तर सरपंचपदाच्या १९४ जागांसाठी १ हजार ३११ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

माघारीनंतर ६१० उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये सदस्यपद, तर काही ठिकाणी सरपंचपदाची जागा बिनविरोध झाल्या आहेत. रविवारी (ता.५) मतदानानंतर सोमवारी (ता.६) सकाळी मतमोजणी झाली. संगमनेर तालुक्यात माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सातपैकी पाच जागांवर सत्ता कायम राहिली.

दोन ग्रामपंचायत विखे गटाला सत्ता मिळाली. राहता तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या पुणतांबा तसेच वाकडी ग्रामपंचायतीवर यावेळी कोल्हे गटाने सत्ता मिळवली. येथे पालकमंत्री विखे पाटलांना धक्का बसला.

शेवगाव, पाथर्डी, जामखेड, कर्जत, नेवासा, श्रीगोंदा, पारनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, अकोले तालुक्यांतील बहुतांश गावात स्थानिक आघाड्यांनी सत्ता मिळवली. काही ठिकाणी सत्ता परिवर्तन झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bitter Gourd : कारले लागवडीत खत, कीड-रोग व्यवस्थापनावर भर

Agriculture Spentwash : स्पेंटवॉश : प्रदूषणातून मुक्ती, सुपीकतेची युक्ती

Sugarcane Farming : आडसाली उसासाठी ठिबकद्वारे अन्नद्रव्यांचा वापर

Nilesh Lanke : दूध आणि कांदा दरवाढीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर खा. लंकेंचा मोर्चा; कार्यकर्ते व पोलिस भिडले!

Warehouse Management : माहिती तंत्रज्ञानातून गोदामाचे नियोजन

SCROLL FOR NEXT