Caste Census : जखणगाव ग्रामपंचायत जातिनिहाय जनगणना करणार

Jakhangaon Gram Panchayat Caste Census News : जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेणारे जखणगाव हे राज्यातील सर्वात पहिले गाव असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Caste Census
Caste Census Agrowon

Nagar News : तालुक्यातील जखणगाव ग्रामपंचायतीने जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला आहे. त्यानंतर कामाला सुरुवातही झाली आहे. जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेणारे जखणगाव हे राज्यातील सर्वात पहिले गाव असल्याचा दावा करण्यात आला आहे.

राज्यात आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. बिहारने नुकतीच जातिनिहाय जनगणना केली. त्यानंतर आरोग्यग्राम म्हणून ओळख असलेल्या जखणगाव येथेही जातिनिहाय जनगणना करण्याचा विषय गावकऱ्यांनी पुढे केला.

त्यानंतर नगर तालुक्यातील जखणगाव ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसंसदेची मासिक बैठक व ग्रामसभा नुकतीच झाली. त्यात मराठा आरक्षण व तत्संबंधी बदललेल्या परिस्थितीवर यात सविस्तर चर्चा करण्यात आली.

Caste Census
Bihar Caste Census : बिहार सरकारने जाहीर केली जातनिहाय जनगणनेची आकडेवारी

गावातील सर्व जातीधर्माच्या लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनुकूलता दर्शवली. सरपंच डॉ. सुनील गंधे यांनी नागरिकांची जातिनिहाय जनगणना करण्यासंदर्भात प्रस्ताव मांडला. त्याला गावातील सेवा सोसायटीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब कर्डिले यांनी अनुमोदन दिले व सर्व ग्रामस्थांनी हा ठराव सर्वानुमते संमत केला.

Caste Census
Telangana Caste Census : तेलंगणमध्ये जातीनिहाय सर्वेक्षण करू

१० दिवसांत गावातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी, मानधनावर काम करणारे सर्व सेवक व पदाधिकाऱ्यांमार्फत जनगणनेचे काम पूर्ण करण्यात येईल. कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा व अडथळे निर्माण करणाऱ्या नागरिकांचा स्वयं स्पष्ट अहवाल ग्रामपंचायत कार्यालयाला सादर करण्याच्या सूचना सरपंच डॉ. सुनील गंधे यांनी ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी यांना दिल्या आहेत.

असा सर्व्हे झाल्याने आरक्षण मुद्दातील वास्तव लक्षात येईल व भविष्यात देशाला एक निर्णायक पाऊल उचलावे लागेल तरच सामाजिक एकोपा टिकेल, असा विचार डॉ. गंधे यांनी या वेळी मत मांडले आणि त्याला सर्वानुमते अनुमोदन दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com