Agriculture Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Loan : कृषीसाठी २ हजार १७१ कोटी रुपयांवर कर्जाचे उद्दिष्ट

Team Agrowon

Hingoli News : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बॅंकेने (नाबार्ड) आगामी आर्थिक वर्षे (२०२४-२५ ) करिता हिंगोली जिल्ह्यासाठी २ हजार ८१० कोटी रुपयांचा संभाव्य वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार केला आहे.

त्यात एकूण कृषी कर्जासाठी २ हजार १७१ कोटी १८ लाख २० हजार रुपये तसेच त्याअंतर्गत पीककर्जासाठी १ हजार ६५० कोटी ५२ लाख ६८ हजार रुपये उद्दिष्टाचा समावेश आहे, अशी माहिती नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक सुनील नवसारे यांनी दिली.

आगामी आर्थिक वर्षामध्ये (२०२४-२५) हिंगोली जिल्ह्यात कृषी कर्जांतर्गत पीककर्जाचे १ हजार ६५० कोटी ५२ लाख ६८ हजार रुपये, जल संसाधनासाठी ५७ कोटी ९९ लाख ४६ हजार रुपये, कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत ११५ कोटी ६७ लाख ७४ लाख रुपये, वृक्ष लागवड व फळबाग लागवडीसाठी ४० कोटी ५८ लाख ७७ हजार रुपये, वनीकरण व पडीक जमीन विकास यासाठी १ कोटी ८५ लाख २६ हजार रुपये,

पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यासाठी ७१ कोटी २८ लाख रुपये, कुक्कुटपालन साठी २५ कोटी १० लाख ६० हजार रुपये, शेळीपालन, मेंढीपालन, वराहपालन यासाठी २० कोटी ५७ लाख ६४ हजार रुपये, मत्स्यपालनासाठी ५ कोटी ५७ लाख ७६ हजार रुपये, इतर कृषी कर्ज १० कोटी ८२ लाख २५ हजार रुपये मिळून एकूण २ हजार कोटी १६ हजार रुपये कर्जाचे उद्दिष्ट आहे.

कृषी पायाभूत सुविधा अंतर्गत शेतीमाल साठवणूक सुविधांच्या उभारणीसाठी ५५ कोटी ९८ लाख ६० हजार रुपये, जमीन सुधारणा, मृदा संधारण, पाणलोट क्षेत्र विकास या घटकांसाठी २७ कोटी ३ लाख ४९ हजार रुपये, इतर कृषी पायाभूत सुविधांसाठी ८ कोटी ६४ लाख रुपये मिळून एकूण ९१ कोटी ६६ लाख ९ हजार रुपये कर्जाचे उद्दिष्ट आहे.

कृषी संलग्न अंतर्गत अन्न व कृषी प्रक्रियांसाठी ६७ कोटी ८६ लाख ९५ हजार रुपये व इतर कृषी संलग्न घटकासाठी ११ कोटी ६५ लाख रुपये मिळून एकूण ७९ कोटी ९ लाख ९५ हजार रुपये कर्जाचे उद्दिष्ट आहे. सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगासाठी ४०१ कोटी २५ लाख रुपये, गृह, शैक्षणिक कर्ज आदी मिळून एकूण २३७ कोटी ६६ लाख ८० हजार रुपये उद्दिष्ट आहे.

हिंगोली जिल्हा २०२४-२५ संभाव्य वार्षिक पतपुरवठा आराखडा दृष्टिक्षेपात (उद्दिष्ट कोटी रुपये)

क्षेत्र उद्दिष्ट

पीककर्ज १६५०.५२६८

कृषी संलग्न कर्ज ३४९.४७४८

कृषी पायाभूत सुविधा ९१.६६.०९

अन्न व कृषी प्रक्रिया ७९.५१९५

सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग ४०१.२५

निर्यात पतपुरवठा ४.८०

शैक्षणिक कर्ज १५.६०

गृह कर्ज ८०.६५

नवीकरणीय ऊर्जा ९.३२

सामाजिक पायाभूत सुविधा २८.३९३०

इतर कर्ज ९८.८०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT