Parbhani News : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बॅंकेने (नाबार्ड) आगामी आर्थिक वर्षे (२०२४-२५ )करिता परभणी जिल्ह्यासाठी ५ हजार ३३ कोटी २४ लाख ४९ हजार रुपयांचा संभाव्य वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार केला आहे.
त्यात एकूण कृषी कर्जासाठी ३ हजार ५५९ कोटी ३८ लाख १९ हजार रुपये तर त्याअंतर्गंतं पीककर्जासाठी २ हजार ६५० कोटी २ लाख २८ हजार रुपये उद्दिष्टाचा समावेश आहे, अशी माहिती नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक एस. के. नवसारे यांनी दिली.
येत्या (२०२४-२५) आर्थिक वर्षामध्ये परभणी जिल्ह्यात कृषी कर्जाअंतर्गंत पीक कर्जाचे २ हजार ६५० कोटी २ लाख २८ हजार रुपये, जल संसाधनासाठी १०४ कोटी ३ लाख ४७ हजार रुपये, कृषी यांत्रिकीकरण अंतर्गंत १३५ कोटी ६० लाख ४० लाख रुपये, वृक्षलागवड व फळबाग लागवडीसाठी ७२ कोटी ९ लाख ८८ हजार रुपये, वनीकरण व पडीक जमिन विकास यासाठी १ कोटी २७ लाख ५० हजार रुपये, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय यासाठी ८६ कोटी ७२ लाख ६३ हजार रुपये,
कुक्कुटपालन साठी ७२ कोटी ६५ लाख ५२ हजार रुपये, शेळीपालन, मेंढीपालन, वराहपालन यासाठी २२ कोटी ३२ लाख ७४ हजार रुपये, मत्स्यापानासाठी ४ कोटी ५७ लाख ८३ हजार रुपये, इतर कृषी कर्ज ८ कोटी ५ लाख ५० हजार रुपये मिळून एकूण ३ हजार १५७ हजार ३७ लाख ७५ हजार रुपये कर्जाचे उद्दिष्ट आहे. कृषी पायाभूत सुविधा अंतर्गंत शेतीमाल साठवणुकीसाठी वखार गोदाम, मार्केट यार्ड,
गोदाम, सायलोज, शितगृह, शितगृह साखळी सुविधांच्या उभारणीसाठी ८३ कोटी ८५ लाख ९० हजार रुपये, जमिन सुधारणा, मृदा संधारण, पाणलोट क्षेत्र विकास या घटकांसाठी २४ कोटी ८ लाख ७४ हजार रुपये, इतर कृषी पायाभूत सुविधांसाठी ७ कोटी ६८ लाख रुपये मिळून एकूण ११५ कोटी ६२ लाख ६४ हजार रुपये कर्जाचे उद्दिष्ट आहे.
कृषी संलग्न अंतर्गंत अन्न व कृषी प्रक्रियासाठी २७० कोटी ४७ लाख ८० हजार रुपये व इतर मिळून एकूण २८६ कोटी ३७ लाख ८० हजार रुपये कर्जाचे उद्दिष्ट आहे. सुक्ष्म, लघू, मध्यम उद्योग, गृह,शैक्षणिक कर्ज आदी मिळून एकूण १ हजार ४७३ कोटी ८६ लाख ३० हजार रुपये उद्दिष्ट आहे.
वार्षिक पतपुरवठा आराखडा २०२४-२४
संभाव्य कर्जपुरवठा आराखडा दृष्टीक्षेपात (उद्दिष्ट कोटी रुपये)
क्षेत्र उद्दिष्ट
कृषी कर्ज ३१५७.३७
कृषी पायाभूत सुविधा ११५६.६२
अन्न व कृषी प्रक्रिया २८६.३७
सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग ११०१.४५
निर्यात पतपुरवठा २४.००
शैक्षणिक कर्ज ५७.६०
गृह कर्ज १३२.१६
नवीकरणीय ऊर्जा ११.५७
सामाजिक पायाभूत सुविधा ४२.००
इतर कर्ज १०५.०७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.