Mahayuti Government Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Women Empowerment: लाडकी बहीण योजनेतून ९ टक्के व्याजदराने कर्ज; महिलांसाठी सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Government Loan Scheme: महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पुढील टप्प्यात महिलांना केवळ ९ टक्के अल्प व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे.

Roshan Talape

Pune News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि विविध महामंडळांच्या योजनांद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी केवळ ९ टक्के अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राज्यातील महिलांना आत्मनिर्भर उद्योजक बनवण्यासाठी शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सद्यःस्थितीत या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा १५०० रुपये मानधन दिले जाते. पण आता त्यापुढे जात, महिलांना उद्योग-व्यवसायासाठी कर्ज मिळावे यासाठी विशेष कर्ज उपक्रम राबवण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता १९) ला मुंबईतील वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार असून त्या आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम बनतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य शासन महिलांना केवळ सन्मान देत नाही, तर त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना वैयक्तिक व सामूहिक स्वरूपात कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच यासाठी मुंबई बँक आणि काही वित्त महामंडळ एकत्र येऊन महिलांना कर्ज देणार आहेत.

माझी लाडकी बहीण योजना तसेचअण्णासाहेब पाटील महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, पर्यटन संचालनालय, आणि इतर वित्त महामंडळांच्या कर्ज योजनांची सांगड घालण्यात येणार आहे. त्याद्वारे पात्र महिलांना व्यवसायासाठी फक्त ९ टक्के व्याजदराने कर्ज मिळणार आहे.

या बैठकीवेळी आमदार तथा मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, आमदार चित्रा वाघ, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, सहसचिव वि. रा. ठाकूर, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष मिलिंद कांबळे आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान, आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, या योजनेमुळे महिलांना सूक्ष्म आणि लघुउद्योग सुरू करण्यास मदत मिळेल. मुंबई बँकेच्या कर्ज धोरणानुसार एक लाख किंवा त्याहून अधिक रकमेचे कर्ज या लाभार्थी महिलांना मिळू शकते. तसेच मुंबई आणि उपनगरात सुमारे १६ लाख महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत, आणि सर्वांना या योजनेचा फायदा होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lumpy Skin Disease: सोलापुरात ‘लम्पी’चा संसर्ग वाढला; संपूर्ण जिल्हा नियंत्रित क्षेत्र घोषित

Maharashtra Corrupt Ministers: कलंकित, भ्रष्ट मंत्री, आमदारांची हकालपट्टी करा

Achalpur APMC Scam: अचलपूर समितीत कोट्यवधीचा बांधकाम घोटाळा

Cow Based Farming: देशात गौ आधारित कृषी पद्धतीला मिळावी चालना

Livestock Registration: ‘कृषी’ दर्जानंतर पशुपालकांच्या नोंदणीला मिळेना प्रतिसाद

SCROLL FOR NEXT