Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत 50 लाख महिलांवर अपात्रतेची टांगती तलवार: उत्पन्न पडताळणीला सुरुवात

Women Empowerment: राज्य सरकार ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून 50 लाख महिलांना अपात्र ठरविण्याची शक्यता आहे.या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील आणि कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणाऱ्या महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaAgrowon
Published on
Updated on

News: राज्य सरकार ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून 50 लाख महिलांना अपात्र ठरविण्याची शक्यता आहे.या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील आणि कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणाऱ्या महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात.परंतु,आता सरकारने उत्पन्न पडताळणी प्रक्रिया सुरू केल्यामुळे वरील महिलांचे अर्ज बाद होऊ शकतात,असे महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

Ladki Bahin Yojana
Majhi Ladki Bahin Yojna : ‘‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’चे त्रुटी असलेले अर्ज फेरसादर करा’

सरकारने हि योजना 1 जुलै 2024 पासून अंमलात आली.योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक स्वातंत्र्य,आरोग्य आणि पोषण सुधारणा तसेच कुटुंबात निर्णायक भूमिका मजबूत करणे आहे.आतापर्यंत 2 कोटी 63 लाख महिलांनी अर्ज केले, त्यापैकी 2 कोटी 41 लाख महिला पात्र ठरल्या तर 11 लाख अर्जांची पडताळणी बाकी आहे. हि योजना महायुती सरकारच्या निवडणूक यशात महत्त्वाची ठरली.

Ladki Bahin Yojana
Ladaki Bahin Scheme : आठ लाख लाडक्या बहिणींचा विश्वासघात; लाडकी बहिण योजनेवरून विरोधकांकडून हल्लाबोल

परंतु, अनेक अपात्र महिलांनी योजनेचा लाभ घेतल्याच्या तक्रारींमुळे पडताळणीला गती देण्यात आली आहे. उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असणे, सरकारी कर्मचारी कुटुंबातील सदस्य असणे, चारचाकी वाहन मालकी किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना अपात्र ठरविण्यात येत आहे. आतापर्यंत 2,289 सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचे उघड झाले असून, त्यांना पैसे मिळणार नाहीत. तसेच, 5.5 लाख महिलांचे अर्ज यापूर्वीच बाद झाले आहेत.पडताळणी प्रक्रियेत आधार कार्ड आणि बँक खाते लिंक नसणे, चुकीची माहिती देणे किंवा इतर योजनांचा लाभ घेणे यांसारखी कारणे आढळली आहेत.

सरकारने यापूर्वी दिलेले पैसे परत घेणार नसल्याचे जाहीर केले आहे, परंतु नवीन हप्ते केवळ पात्र महिलांनाच मिळतील. नागरिकांना ई-केवायसी पूर्ण करण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही पडताळणी योजनेच्या पारदर्शकतेसाठी आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी महत्त्वाची आहे, असे सरकारचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com