Leopard Attack
Leopard Attack Agrowon
ॲग्रो विशेष

Leopard Attack : पाटणला बिबट्याच्या हल्ल्याने पशुधन धोक्यात

Team Agrowon

Patan News : पाटण तालुक्यातील विविध ठिकाणी सातत्याने होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे बळीराजाचे पशुधन धोक्यात आले आहे. तालुक्याच्या पाचही खोऱ्यांत मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर वाढला आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या शिवारात चरायला सोडलेल्या शेळ्या, मेंढ्यांवर बिबट्या हल्ला चढवून त्या फस्त करत आहे.

त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. नागरी वस्तीतही बिबट्या पाळीव प्राण्यांवर हल्ले करत असल्याने गावागावांत भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

तालुक्यातील ढेबेवाडी, कोयना, तारळे, चाफळसह अन्य भागात बिबट्याचा हल्ला वाढला आहे. शिवारात चरायला सोडलेल्या शेळी, मेंढ्यांवरही बिबट्या हल्ला चढवून त्या फस्त करत आहेत. त्यामुळे तालुक्यातील गावागावांत डोंगरदऱ्यातील वाडी-वस्तीवरील शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. बिबट्या पाळीव जनावरे फस्त करत असल्याने शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले आहे. त्यामुळे गावागावांत भीतीचे वातावरण आहे.

शेतकरी शेतात जाताना भीतीच्या छायेखाली आहेत. डोंगराच्या कुशीत वसलेल्या गावात अत्यंत बिकट स्थिती आहे. गावाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात झाडी असल्याने श्‍वापदांचा त्रास होत आहे.

अशी आहे नुकसान भरपाई स्‍थिती

वर्ष शेतीपीक नुकसान पशुधन नुकसान

२०१५ व १६ २२३१ प्रकरणे - ६६ लाख ८० हजार ६३३ १४९-आठ लाख २६ हजार ३००

२०१६ व १७ १५७५ प्रकरणे - ६३ लाख २३ हजार ३०५ १३२-सात लाख सात हजार ७५०

२०१७ व १८ १४३२ प्रकरणे - ५९ लाख २६ हजार ०२२ १४७-दहा लाख ३८ हजार ०६९

२०१८ व १९ २११० प्रकरणे - ८८ लाख ३५ हजार ९२७ १४७ - १९ लाख ३८ हजार १६२

२०१९ व २० २२०१ प्रकरणे - ८१ लाख १२ हजार २१० ३६७ - ३० लाख ६१ हजार ४९८

बिबट्याचे गुरगुरणे...

अनेक भागांत बिबट्या मादीचा पिल्लांसह वावर असल्याचे शेतकरी सांगत आहेत. शेळ्या, मेंढ्यांवर हल्ला केला, की ती शिकार ओढून ते जंगलात नेत आहेत. त्यामुळे बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला, तरी तो गुरगुरत अंगावर येत आहे. बिबट्याच्या गुरगुरण्यामुळेही भीती निर्माण होऊन कोणीच विरोध करताना दिसत नाही. त्यामुळे वन विभागाने सापळा लावून बिबट्या मादीसह पिल्लांना जेरबंद करावे, अशी मागणी आहे.

अनुदानावर झटका मशिन देण्याची मागणी

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यावर मर्यादा आहेत. काही पाऊल उचलल्यास वन्यजीव कायद्याची अडचण आहे. त्यामुळे उभे पीक डोळ्यासमोर फस्त होताना पाहावे लागते.

यासाठी उपाय म्हणून अद्ययावत असणारे झटका मशिन शासनाने अनुदानावर देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. या मशिनमुळे प्राण्यांच्या जिवाला धोका होणार नसून पिकांचेही संरक्षण होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Scheme : शेतकऱ्यांसाठी ५० हजार गावांमध्ये विशेष योजना; शेतकऱ्यांना हवामान बदलात उत्पादन वाढीसाठी करणार मदत

Soybean Sowing : सोयाबीनचा ४ लाख ४७ हजारांवर हेक्टरवर पेरा

Ashadhi Wari 2024 : 'रामकृष्ण हरीचा जयघोषात' संत तुकाराम महाराजांचा पहिला रिंगण सोहळा संपन्न

Employment Opportunities : रानभाज्यांतून रोजगार संधी

APMC Market : सभापतींची बैठकही निष्फळ; बाजारात शुकशुकाट

SCROLL FOR NEXT