Grape Harvest Festival  Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Harvest Festival : ‘ग्रेप हार्वेस्ट’ला ग्राहकांचा अल्प प्रतिसाद

Nashik Grape Festival : ‘ग्रेपसिटी’ म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये उत्पादित होणारी द्राक्षे व वाइन यांचे ‘ब्रॅण्डिंग’ करण्यासाठी पर्यटन संचालनालयाने ‘नाशिक ग्रेप हार्वेस्ट फेस्टिव्हल’चे आयोजन केले आहे.

Team Agrowon

Nashik News : ‘ग्रेपसिटी’ म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये उत्पादित होणारी द्राक्षे व वाइन यांचे ‘ब्रॅण्डिंग’ करण्यासाठी पर्यटन संचालनालयाने ‘नाशिक ग्रेप हार्वेस्ट फेस्टिव्हल’चे आयोजन केले आहे. शनिवारी (ता. २४) आणि रविवारी (ता. २५) हा त्र्यंबक रोडवर दोनदिवसीय महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

मात्र पहिल्याच दिवशी सहभागी द्राक्ष उत्पादक, विक्रेते व सहभागी शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. देशभरात द्राक्ष उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक द्राक्ष उत्पादक असताना अवघे १६ ते १७ द्राक्ष विक्रेते या ठिकाणी सहभागी आहेत. असे असतानाही ग्राहकांअभावी प्रतिसाद मिळालेला नसल्याचे दिसून आले.

फेस्टिव्हलचे उद्‍घाटन खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते नियोजित होते. मात्र दुपारी चारपर्यंत त्यांची प्रतीक्षा सुरू असताना निरोप मिळाला त्यांचा दौरा रद्द झाला. ऐनवेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या द्राक्ष-कांदा संशोधन केंद्राचे वनस्पती रोग शास्त्रज्ञ प्रा. डॉ. राकेश सोनवणे, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे (आत्मा) प्रकल्प संचालक राजेंद्र निकम,

जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाट, पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालिका मधुमती सरदेसाई यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. या वेळी कृषी पर्यवेक्षक रणजित आंधळे, उद्यानपंडित पुरस्कारप्राप्त शेतकरी भाऊसाहेब जाधव आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी सफेद व रंगीत द्राक्षांची द्राक्ष महोत्सवात ठरावीक विक्रीसाठी मांडणी केली होती. मात्र दुपारपर्यंत गर्दी नसल्याने ग्राहकांची वाट पाहावी लागली. या ठिकाणी कार्यक्रमाची प्रभावीपणे प्रसिद्धी झाली नसल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.

फेस्टिव्हल द्राक्षांचा की इतर घटकांचा..

द्राक्षविषयक फेस्टिव्हल असतानाही येथे द्राक्ष व संबंधित उत्पादनांची गर्दी अपेक्षित होती. मात्र येथे महिला बचत गट, महिलांचे कपडे विक्रेते, इमिटेशन ज्वेलरीचे स्टॉल दिसून आले. त्यामुळे कार्यक्रम नेमका द्राक्षाचा की इतर सर्व घटकांचा असा प्रश्न उपस्थित होतो.

शेतकऱ्यांच्या कष्टाकडे दुर्लक्ष की हलगर्जी?

द्राक्ष उत्पादकांनी थॉमसन, सोनाका, क्लोन, सुधाकर सीडलेस, तर रंगीत वाणात क्रिमसन, फ्लेम सीडलेस, रेड ग्लोबल, मामा जम्बो, शरद सीडलेस, आरा सिलेक्शन अशा विविध वाणांची मांडणी केली होती. शेतकऱ्यांनी स्वखर्चाने या वाहनांचे नमुने प्रदर्शनात मांडले होते.

मात्र कार्यक्रमाचे उद्‍घाटन आटोपताच या ठिकाणचा माल गायब झाल्याचे दिसून आले. त्यामुळे जे शेतकरी सायंकाळी पुन्हा आले व आमचा द्राक्षमाल कुठे आहे, अशी विचारणा करीत असताना याबाबत कोणालाही समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. त्यास दुर्लक्ष म्हणावे की हलगर्जी पणा, असा सवाल उपस्थित होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT