Grape Export : द्राक्ष निर्यातीला गती

Grape Production : युरोपियन देशात द्राक्षाची मागणी वाढली आहे. त्यामुळे राज्यातून द्राक्ष निर्यातीला गती आली आहे.
Grape Export
Grape ExportAgrowon
Published on
Updated on

Sangli News : युरोपियन देशात द्राक्षाची मागणी वाढली आहे. त्यामुळे राज्यातून द्राक्ष निर्यातीला गती आली आहे. आजअखेर २३१० कंटेनरमधून ३० हजार ९९२ टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. या वर्षी युरोपियन देशात द्राक्षाची निर्यात वाढण्याचा प्राथमिक अंदाज उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

राज्यातून द्राक्ष निर्यात दरवर्षी वाढत असल्याचे चित्र आहे. प्रामुख्याने युरोपसह आखाती देशात द्राक्षाची निर्यात होते. जानेवारीत युरोपियन देशात द्राक्ष निर्यातीचा प्रारंभ झाला. परंतु निर्यातीस फारशी गती आली नव्हती. जानेवारीत नेदरलँड, हॉलंड, रोमानिया, नेदरलँड्स अँटिल्स, स्वीडन, स्विझर्लंड या देशात द्राक्ष निर्यात सुरू झाली होती. त्यानंतर स्पेन आणि पोलंड या देशात द्राक्ष पोहोचू लागली आहेत.

Grape Export
Grape Export : देशातून द्राक्ष निर्यातीला अडथळा

नेदरलँडमध्ये २ हजार ३८३ कंटेनरमधून ३० हजार ६५१ टन द्राक्ष पोहोचली आहेत. नेदरलॅंडमधून जर्मनी, युकेसह अन्य भागात द्राक्ष पाठवली जात असल्याने या देशात सर्वाधिक द्राक्षाची निर्यात झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून द्राक्ष पिकास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे द्राक्षाची गोडी वाढणे, द्राक्षाचा रंग आणि आकार वाढीस या पोषक वातावरणाची मदत होत आहे. त्यामुळे द्राक्षाची मागणी वाढत आहे.

Grape Export
Grape Export : राज्यात द्राक्ष निर्यात रखडत

गेल्या पंधरा दिवसांपासून द्राक्ष निर्यात करण्यासाठी गती वाढली आहे. वास्तविक पाहता, सुएझ कालव्यातून वाहतूक बंद असली, तरी निर्यातदार द्राक्ष निर्यात करण्यासाठी पुढे येत असल्याचे चित्र आहे. युरोपियन देशात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निर्यात होते.

गतवर्षी राज्यातून ९० हजार टन द्राक्षाची निर्यात झाली होती. तर २०२१-२२ मध्ये १ लाख टन द्राक्ष युरोपियन देशात पोहोचली होती. बुधवारी (ता. २१) अखेर ३० हजार ९९२ टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. यंदा नाशिक पट्ट्यात नैसर्गिक आपत्तीचे संकट ओढावले नाही तर नाशिकमधून निर्यात वाढेल, असा अंदाज निर्यातदारांनी व्यक्त केला आहे.

राज्यातील निर्यात स्थिती (बुधवारअखेर (ता. २१))

देश...कंटेनर...टन

नेदरलँड...२३८३...३०६५१.५१०

स्विझर्लंड...८...१०२.३९०

रोमानिया...५...६४.८७०

स्वीडन...५...६३.४४०

स्पेन...५...५०.९९०

पोलंड...२...३३.६९६

नेदरलँड्स अँटिल्स...२...२५.४८०

एकूण..२३१०...३०९९२.३७६

द्राक्ष निर्यातीस गती आली आहे. हंगाम अजून दीड महिना आहे. सध्या पोषक वातावरण असल्याने युरोपियन देशात द्राक्षाची मागणी वाढत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निर्यात वाढेल, असा प्राथमिक अंदाज आहे.
- गोविंद हांडे, निर्यात सल्लागार, कृषी आयुक्तालय, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com