Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Rain : पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात हलका ते मध्यम पाऊस

Rain Update : पुणे जिल्ह्यात आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. गुरुवारी (ता. २०) धरणक्षेत्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.

Team Agrowon

Pune News : पुणे जिल्ह्यात आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. गुरुवारी (ता. २०) धरणक्षेत्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे धरणांतील पाण्याची आवक कमीअधिक होत आहे. मात्र अद्याप धरणक्षेत्रात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे शुक्रवारी (ता. २१) सकाळी आठ वाजेपर्यंत टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ४० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर नीरा देवघर धरणक्षेत्रात ३९ मिलिमीटर पाऊस पडला.

इतर धरण क्षेत्रात बऱ्यापैकी कमीअधिक पाऊस झाला असून मागील चोवीस तासांमध्ये धरणात नव्याने ०.६१ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे पाणीपातळीत किंचित वाढ झाली असून, धरणांतील पाणीसाठा १४.७३ टीएमसीपर्यंत पोहोचला आहे.

अनेक ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्य पाऊस पडत आहे. हा पाऊस पेरण्यांसाठी गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.शुक्रवारी (ता. २१) सकाळी आठ वाजेपर्यंत धरण क्षेत्रनिहाय झालेला पाऊस, खालीलप्रमाणे मिलिमीटरमध्ये :

वरसगाव १५, पानशेत १८ खडकवासला १८, पवना ७, कासारसाई ४, कळमोडी १०, चासकमान १०, भामा आसखेड २२, आंध्रा २८, वडीवळे २८, नाझरे ९, गुंजवणी ७, भाटगर ११, पिंपळगाव जोगे २, माणिकडोह १, वडज ६, डिंभे ११, घोड ५, उजनी ६.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT