Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी

Pune Rain News : गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. तर, अधूनमधून कडक ऊन पडत असून दुपारनंतर वातावरणात बदल होत आहे.

Team Agrowon

Pune News : जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे खरिपातील पिकांना दिलासा मिळत असून मूग, उडीद पिकांना नुकसानकारक ठरत आहे. तर, भात पिकांना चांगलाच आधार मिळत असून पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. पावसाचा प्रभाव कमी झाल्याने ओढ्या नाल्याची पाणीपातळी कमी झाली आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. तर, अधूनमधून कडक ऊन पडत असून दुपारनंतर वातावरणात बदल होत आहे. अचानक ढग भरून येत असून पावसास सुरुवात होत आहे. शुक्रवारी (ता.२३) सकाळी आठ वाजेपर्यंत हवेलीतील अष्टापूर येथे ४९ मिलिमीटर पाऊस पडला.

तर उरुळीकांचन येथे २३ मिलिमीटर, तर पुणे वेधशाळा, केशवनगर, कोथरूड, खडकवासला, भोसरी, चिंचवड, कळस, वाघोली परिसरांत पावसाचा शिडकावा झाला. मुळशीतील थेरगाव येथे १४ मिलिमीटर पाऊस झाला असून पौड, घोटावडे, माले, मुठे, पिरंगुट भागांत ढगाळ वातावरण होते.

भोरमधील भोलावडे येथे तुरळक सरी पडल्या. तर नसरापूर, किकवी, वेळू, आंबवडे, संगमनेर, निगुडघर येथे पावसाने उघडीप दिली होती. मावळमधील वडगाव मावळ येथे १४ मिलिमीटर, तर तळेगाव, काले, खडकाळा, शिवणे येथे तुरळक सरी पडल्या. वेल्ह्यातील पानशेत, विंझर, आंबवणे येथेही पावसाच्या अधूनमधून सरी कोसळल्या. त्यामुळे भात खाचरातील पाणी पातळी कमी झाली आहे.

जिल्ह्याच्या उत्तरेकडील जुन्नर तालुक्यातील बेल्हा येथे ३५ मिलिमीटर, तर निमगाव सावा २६, आपटाळे येथे १८ मिलिमीटर, तर जुन्नर, नारायणगाव, वडगाव आनंद, राजूर, डिंगोरे, ओतूर येथे तुरळक सरी झाल्या. खेडमधील वाडा, कुडे येथे १४ मिलिमीटर, तर पाईट, आळंदी, कन्हेरसर, कडूस येथे हलक्या सरी झाल्या. आंबेगावमधील घोडेगाव येथे २६ मिलिमीटर, तर कळंब १०, मंचर येथे १४ मिलिमीटर, तर पारगाव, मंचर, आंबेगाव येथे अधूनमधून सरी पडल्या.

शिरूरमधील तळेगाव, कोरेगाव येथे १२ मिलिमीटर, तर रांजणगाव १४, तर टाकळी, वडगाव, न्हावरा, मलठण, शिरूर येथे तुरळक पाऊस झाला. बारामती तालुक्यात पावसाने उघडीप दिली होती. तर इंदापुरातील इंदापूर शहरात १० मिलिमीटर, तर बावडा, काटी येथे तुरळक सरी पडल्या असून निमगाव, अंथुर्णे, सणसर भागांत ढगाळ वातावरणासह कडक ऊन पडले होते. दौंडमधील यवत येथे ४० मिलिमीटर, बोरी भदक ३६, खामगाव २२ मिलिमीटर पाऊस झाला. तर वडगाव बांदे येथे तुरळक सरी कोसळल्या. पुरंदरमधील जेजुरी येथे हलका पाऊस झाला. त्यामुळे खरिपातील बाजरी, कापूस पिकांना दिलासा मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दोन हप्ते एकदम?; मार्च, एप्रिलचा ७३० कोटी निधी मंजूर

Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?

Papaya Cultivation: पपई लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

SCROLL FOR NEXT