Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : रत्नागिरी, सिंधुदूर्गात पावसाच्या हलक्या सरी

Monsoon Rain : राज्यातील पावसाचा जोर कमी-अधिक होत आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मंगळवारी (ता. २५) पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : राज्यातील पावसाचा जोर कमी-अधिक होत आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मंगळवारी (ता. २५) पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम पाऊस पडला. याशिवाय उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे.

मंगळवारी (ता. २५) दिवसभर अनेक ठिकाणी ऊन पडले होते. शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी कोकणात धो-धो पाऊस पडल्यानंतर त्याचा जोर कमी झाला आहे.

मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत रत्नागिरीतील आंबलोली येथे सर्वाधिक ९८.५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. या पावसामुळे कोकणात भात खाचरे भरून वाहत आहेत. लवकरच भात लागवड होईल, अशी शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.

खानदेशातही तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत. त्यामुळे कापूस, सोयाबीन पिकांना दिलासा मिळू लागला आहे. अनेक ठिकाणी पेरण्या वेगात सुरू आहेत. नाशिक भागातही पावसाने चांगली हजेरी लावली आहे. या पावसामुळे (Rain) विहीर, बोअरवेलच्या पाणी पातळीत वाढ होऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात कमी झाला आहे.

नगर जिल्ह्यातही नेवासा भागात हलका पाऊस पडला. पुणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून अधूनमधून ऊन पडत आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

जालना (Jalna) जिल्ह्यात काही प्रमाणात ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी अधूनमधून पावसाचा शिडकावा झाला. बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. यामुळे पेरण्यांची लगबग वेगात सुरू आहे.

पूर्व विदर्भात पेरण्या खोळंबल्या

विदर्भात बुलडाणा, वाशीम, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांत पावसाच्या काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. तर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्याची स्थिती आहे.

मंगळवारी (ता.२५) सकाळी आठ वाजेपर्यंतचा मंडलनिहाय पाऊस (मिमी) : स्रोत कृषी विभाग

माखजन ६७, सौदल ६५, अंबेरी ६६, वेतोरे ७५, पिंगुली ६६, वेहेलगाव ८३, विंचूर ८८, देवळा ६७, लोहनेर ६७, ब्राम्हणवेल ७०, पिंपळगाव ६५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT