Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Rain : तीन जिल्ह्यात सर्वदूर हलका मध्यम पाऊस

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तिन्ही जिल्ह्यात सोमवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासात सर्व मंडलांमध्ये तुरळक, हलका, मध्यम पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगरच्या तुलनेत जालना व बीड जिल्ह्यात पावसाचा जोर थोडा अधिक होता. सर्व दूर पाऊस असला तरी पावसात म्हणावा तसा जोर नाही. नदी नाल्यांना पूर नाही, त्यामुळे पाणी साठ्यातही अपेक्षित वाढ होत नसल्याची स्थिती आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व ८३ मंडलांमध्ये हजेरी लावणारा पाऊस बहुतांश मंडळात तुरळक, हलक्या स्वरूपाचाच होता. जालना जिल्ह्यातील सर्व ४९ मंडलांत हजेरी लावणारा पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा होता. बीड जिल्ह्यातही सर्व ६३ मंडलांत पावसाने हजेरी लावली. ही हजेरी काही ठिकाणी तुरळक स्वरूपाची तर बहुतांश मंडलामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाची होती. पावसाळ्यातील जवळपास पावणे दोन महिन्याचा कालावधी लोटला असताना अजूनही पावसात अपेक्षित जोर दिसत नाही. त्यामुळे अजूनही टप्प्याटप्प्याने जोरदार ते दमदार पावसाची मराठवाड्याला प्रतीक्षा आहे.

जिल्हानिहाय पावसाची मंडळे (पाऊस मिलिमीटरमध्ये)

छत्रपती संभाजीनगर जिल्हा

छत्रपती संभाजीनगर २५.५, उस्मानपुरा १२.८, भावसिंगपूर २८.३, चिकलठाण १२.५, चित्तेपिंपळगाव १०, करमाड १२.३, कचनेर ११, पिसादेवी १५, वरुडकाजी १५, आसेगाव १३.८, वैजापूर ११.८, बाजार सावंगी १०.८, सिल्लोड २१.८, भराडी ११.८, सावलदबारा १४.३, फुलंब्री १०.

जालना जिल्हा

भोकरदन १६.३, सिपोरा १२.८, धावडा १५, राजूर ३७, केदारखेडा ३७, जाफराबाद १५.५, माहोरा १२.८,, कुंभारझरी १०.८, टेंभुर्णी १६, जालना शहर २५, जालना ग्रामीण १८.३, वाघरूळ ४४, नेर ३७.८, शेवली १७.३, विरेगाव १५.३, पाचणवडगाव २५, अंबड १३, धनगरपिंपरी ११, सुखापुरी १५, परतूर २३.८, वाटूर २९.३, आष्टी १२.५, श्रीष्टी २५, सातोना ५०.३, बदनापूर २१.८, शेळगाव २०, दाभाडी ३७ बावणे पांगरी १५.८, रोशनगाव २१.८, घनसावंगी १९.५, राणी उचेगाव १६.५, तीर्थपुरी १३.५, रांजणी १८.३, मंठा ५०, तळणी ११.३, ढोकसाळ ३४.८, पांगरी २९.३.

बीड जिल्हा

बीड २०.३, पाली ३१.३, नाळवंडी १९, राजुरी नवगण १२.३, पेंडगाव १५, मांजरसुंबा १०.३, चौसाळा १६.८, नेकनूर ११.५, लिंबागणेश १२.५, दासखेड १५.८, अमळनेर ११.३, पाचेगाव १३.३, चकलांबा १०.५, माजलगाव १५.३, गंगामसला १०.५, किट्टीआडगाव १२.५, नित्रुड १२, दिंद्रुड १४.५, अंबाजोगाई २७.३, पाटोदा (म) ३६.८, लोखंडी सावरगाव ३२.३, घाटनांदुर ५३.५, बर्दापूर ५३.५, केज २३, युसूफ वडगाव २०.३, हनुमंत पिंपरी १८.५, होळ २०.३, विडा १७, बनसारोळा ३०.८ , नांदुर घाट १८.८, परळी ३०, धर्मापुरी ३४, नागापूर २५.३ ,शिरसाळा ११.३, पिंपळगाव १३, धारूर ३०.३, मोहखेड १९.५, तेलगाव १९.५, वडवणी १२.८, कवडगाव १८.८, शिरूर १०, रायमोहा १०.८, तींतरवणी १०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT