SMART Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Smart Project : झेंडेवाडीतील शेतकऱ्यांना अंजिराच्या मूल्यसाखळीचे धडे

Fig Cultivation : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पच्या (स्मार्ट) मूल्यसाखळी विकास शाळा कार्यक्रमांतर्गत पुरंदर लक्ष्मी फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या सभासद शेतकऱ्यांसाठी अंजीर पिकाच्या मूल्यसाखळी शेतीशाळेचे आयोजन मंगळवारी (ता.१९) करण्यात आले होते.

Team Agrowon

Pune Anjeer Farming News : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पच्या (स्मार्ट) मूल्यसाखळी विकास शाळा कार्यक्रमांतर्गत पुरंदर लक्ष्मी फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या सभासद शेतकऱ्यांसाठी अंजीर पिकाच्या मूल्यसाखळी शेतीशाळेचे आयोजन मंगळवारी (ता.१९) करण्यात आले होते.

‘आत्मा’चे पुणे जिल्ह्याचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ, तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक स्मिता वर्पे, कृषी सहायक योगेश पवार यांच्या समन्वयाने हा कार्यक्रम घेण्यात आला होता.

या शेतीशाळेत स्मार्टचे जिल्हा अंमलबजावणी कक्षाचे नोडल अधिकारी अंकुश बरडे यांनी शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका तयार करण्यासाठी माती नमुना काढण्याची पद्धत, सेंद्रिय कर्ब, जैविक आच्छादन, जैविक खते वापरून उत्पादन खर्च कमी कसा करावा, जमीन आरोग्यपत्रिकेनुसार खत व्यवस्थापन व महत्त्व, सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर या विषयांवर मार्गदर्शन केले.

प्रगतिशील शेतकरी मुरलीधर झेंडे यांनी कमी खर्चात योग्य वेळेत औषधे व खते वापरून जास्तीत जास्त उत्पादन कसे घ्यावे, त्याच बरोबर मार्केटिंग करताना मालाच्या प्रतवारीचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले. या वेळी पुरंदर लक्ष्मी शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष संगीता झेंडे, सचिव स्नेहल खटाटे, विठ्ठल झेंडे, विशाल खटाटे व अंजीर उत्पादक उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT