Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : पुणे जिल्ह्यातील सात धरणांत एक टक्क्यांपेक्षा कमी साठा

Dam Water Storage : रब्बी हंगाम सुरू असल्याने जानेवारी महिन्यात पाण्याचा वापर काही प्रमाणात वाढला आहे.

Team Agrowon

Pune News : : रब्बी हंगाम सुरू असल्याने जानेवारी महिन्यात पाण्याचा वापर काही प्रमाणात वाढला आहे. त्यातच वरसगाव, पानशेत, वीर, येडगाव, उजनी, खडकवासला आणि पवना अशा धरणांतून पाणी सोडण्यात आले आहे.

त्यामुळे धरणांतील पाणीपातळी कमी होऊ लागली आहे. आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर झाला आहे. सध्या सात धरणांत एक टक्क्यांपेक्षा कमी साठा असून उर्वरित धरणांत ९२.४५ टीएमसी पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यात एकूण २७ धरणे असून, या सर्व धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १९८.३४ टीएमसी एवढी आहे. यंदा सर्व धरणे मिळून १६८.६१ टीएमसी म्हणजेच ८५ टक्के पाणीसाठा झाला होता. त्यापैकी सध्या ९२.४५ टीएमसी म्हणजेच ४६ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.

गेल्या वर्षी याच काळात या धरणांत १६६.२० टीएमसी म्हणजेच ८३.७९ टक्के साठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी ७३.७५ टीएमसी एवढा पाणीसाठा कमी आहे. यात उजनी धरणांतील पाणीसाठा उणेमध्ये गेला आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील धरणांत अजूनही बऱ्यापैकी पाणीसाठा असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाण्याची फारशी अडचण भासणार नसली तरी पाण्याचा जपून वापर करण्याची गरज आहे.

सध्या जिल्ह्यातील खडकवासला धरणाच्या डाव्या कालव्यातून जलवाहिनीद्वारे २५१ क्युसेक, तर उजव्या कालव्याला ८०३ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर वरसगाव, पानशेतमधून विद्युतगृहासाठी प्रत्येकी ६०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पवना धरणामधूनही विद्युतगृहासाठी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. चासकमानमधून डाव्या कालव्याला ५५०, वीर धरणातून डाव्या कालव्याला ७२७, तर उजव्या कालव्याला १४०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.

पिंपळगाव जोगेतून डाव्या कालव्याला २६०, येडगावमधून १४००, डिंभे ६५०, उजनीतून डाव्या कालव्याला बोगद्यातून ३५० क्युसेक, तर उजव्या कालव्याला २४०० क्युसेकने पाणी सोडलेले आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट होत आहे.

खोरे --- उपयुक्त पाणीसाठा --- उपलब्ध पाणीसाठा -- टक्केवारी

मुठा खोरे --- २९.१५ --- १८.७१ --- ६४

नीरा खोरे --- ४८.३३ --- ३०.०१ -- ६२

कुकडी खोरे --- ३५.३४ --- २१.३५ -- ६०.४२

उजनी --- ५३.५७ --- उणे १४.७५ -- ०.९७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT