El Nino 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

El Nino 2024 : 'एल निनो'चा प्रभाव कमी; ला निना स्थितीबद्दल जागतिक हवामान संस्थांचा अंदाज काय?

२०२४ च्या मॉन्सूनमध्ये पाऊस कसा असेल याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. जागतिक संस्थांचे प्राथमिक अंदाजही प्रकाशित होत आहेत.

Dhananjay Sanap

२०२४ च्या मॉन्सूनमध्ये पाऊस कसा असेल याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. जागतिक संस्थांचे प्राथमिक अंदाजही प्रकाशित होत आहेत. एल निनोमुळे मॉन्सून यंदाही दगा देणार असं भाकीत केलं जात आहे, तर दुसरीकडे ला निना सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०२३ वर्षे शेतकऱ्यांची परीक्षा घेणारं ठरलं. उत्तर भारतात वादळी पाऊस बसरत होता त्याचवेळी दक्षिणेत शेतकरी मात्र निढळावर हात ठेवून पावसाची वाट पाहत होते. पाहता पाहता खरीप हातचा गेलाच. उत्पादकता घटली. त्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक गणित कोलमडलं. रब्बीत कसंबसं पीक हाती येईल, असं वाटत असताना राज्यातील काही भागात काढणीच्या हंगामात अवकाळी पाऊस सुरू झाला. त्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली.

गेल्यावर्षी भारतीय मॉन्सूनवर अवकृपा झाली ती एल-निनोची. यंदाही म्हणजेच २०२४ च्या मॉन्सून हंगामात एल निनोचा प्रभाव जाणवू शकतो, अशी शक्यता गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात जागतिक हवामान संस्थांनी वर्तवली होती. पण आता मात्र फेब्रुवारी माहिन्यात अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने डिसेंबर २०२३ पासून प्रशांत महासागरातील बहुतांश पृष्ठभागावरील तापमानात घट झाल्याची स्थिती निर्माण झाल्याचं जाहीर केलं आहे.

ला निना स्थिति ?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल प्रशांत महासागरच्या पृष्ठभागाच्या तापमानात घट झाली की, नेमकं काय होतं? तर ०.५ अंश सेल्सियसनं प्रशांत महासागरच्या पृष्ठभागाचं तापमान वाढतं त्यावेळी एल निनोची स्थिती निर्माण होते. तर ०.५ अंश सेल्सियसनं तापमान कमी होतं त्यावेळी ला निना स्थिती तयार होते. ला निना स्थिती भारतीय मॉन्सूनवर सकारात्मक प्रभाव टाकते. म्हणजेच ला निना वर्षात मॉन्सूनमध्ये पाऊस चांगला पडतो, असं हवामान अभ्यासक सांगतात. त्यामुळे प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील तापमान कमी होत जाण्याचे संकेत भारतातील शेतकऱ्यांसाठी चांगले समजले जातात.

नोआचा अंदाज काय?

नोआच्या अंदाजानुसार एप्रिल ते जूनच्या दरम्यान एल निनो न्यूट्रल स्थिती येण्याची शक्यता ७९ टक्के आहे. तर जून ते ऑगस्टमध्ये ला निना स्थिती तयार होण्याची शक्यता ५५ टक्के आहे. त्यामुळे भारतात मॉन्सून चांगला पडू शकतो, असा जागतिक हवामान संस्थांचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी चांगले संकेत आहेत. अर्थात भारतीय हवामानशास्त्र विभाग एप्रिल महिन्यात मॉन्सूनचा पहिला अंदाज जाहीर करेल, त्यावेळी याबद्दल अधिक स्पष्टता येईल.

एल निनो तापदायक

एल निनोमुळे जागतिक पातळीवर २०२३ वर्षे सर्वाधिक उष्णतेचं वर्ष ठरलं. तर भारतात ऑगस्ट महिन्यात १२० वर्षातील सर्वात मोठे पावसाचे खंड पाहायला मिळाले. त्यामुळे डिसेंबरपर्यंत देशातील २५ टक्के भाग दुष्काळाशी सामना करत होता. फेब्रुवारी अखेर देशातील १५० मोठ्या धरणातील पाण्याच्या साठा झपाट्याने कमी होतोय. त्यामुळे येणाऱ्या उन्हाळा अधिक कठीण ठरण्याची शक्यता हवामान अभ्यासक व्यक्त करतायत. थोडक्यात काय तर एल निनोचा कमी होणारा प्रभाव २०२४ च्या मॉन्सूनला पोषक ठरेल. पण त्याआधी उन्हाळा मात्र शेतकऱ्यांसाठी खडतर असण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

SCROLL FOR NEXT