Leopard Safari Agrowon
ॲग्रो विशेष

Leopard Attack : हिवरखेडे शिवारात बिबट्या जेरबंद

शिवारालगत जंगल असल्याने या परिसरात रानडुक्कर, हरीण, कोल्हे लांडगे, आदी प्राण्यांचा सततचा वावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

Team Agrowon

Parola News : तालुक्यातील हिवरखेडे खुर्द शिवारात २३ व २४ फेब्रुवारीला गावातील विजय ताथू पाटील व शेतकरी गोरख यादव पाटील यांच्या गाय व वासराला बिबट्याने ठार करून परिसरात दहशत निर्माण केली होती.

परिणामी शेतकऱ्यांनी हिंस्र प्राण्याचा शोध घ्यावा, परिसरात कॅमेरे लावावे, पिंजरा बसववा, अशी मागणी वन विभागाकडे केली होती.

दरम्यान, या घटनेची प्रत्यक्ष पाहणी वनपरिक्षेत्र अधिकारी श्यामकांत देसले, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी करून शेतकऱ्यांना दक्ष राहण्याचे आवाहन केले होते.

या वेळी वन विभागाकडून या घटनेची चाचपणी करण्यात येऊन हल्ला झालेल्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले होते.

या वेळी वनपरिक्षेत्र अधिकारी श्‍यामकांत देसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनमजूर, वनपाल वन कर्मचारी लक्ष ठेवून होते.

अखेर, शुक्रवारी (ता. १०) रात्री आठ ते दहाच्या दरम्यान हिवरखेडे शिवारातील शेतात बिबट्यास जेरबंद करण्यात यश आले असून, या बिबट्यास पिंजऱ्यात कैद करण्यात आले आहे.

या शिवारालगत जंगल असल्याने या परिसरात रानडुक्कर, हरीण, कोल्हे लांडगे, आदी प्राण्यांचा सततचा वावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

दरम्यान, याबाबत शेतकऱ्यांकडून पीक संरक्षणाची मागणी देखील यावेळी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, बिबट्याला जेरबंद केल्यामुळे परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Haryana agriculture loans : कृषी कर्ज वाटपासाठी हरियाणा सरकार वापरणार तंत्रज्ञान; बँकाचे खेटे मारण्याची गरज नाही

Akola Mayor Election: अकोल्यात भाजपच्या खेडकर महापौर, तर गोगे उपमहापौर

Rubber MSP: नैसर्गिक रबर दरात घसरण, हमीभाव देण्याची कर्नाटकची केंद्राकडे मागणी

Wheat Crop Management: ढगाळ वातावरणात गहू पिकासाठी उपाययोजना

Sugar Production: ‘नॅचरल शुगर’मध्ये नऊ लाख १११ व्या साखर पोत्याचे पूजन

SCROLL FOR NEXT