Bibtya Safari : जुन्नरला 'हिरडा प्रक्रिया'सह, बिबट सफारीला मंजुरी

पर्यटनातून रोजगार निर्मितीसाठी जुन्नरला हिरडा प्रक्रिया उद्योगासह बिबट्या सफारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे.
Bibat Safari
Bibat Safari Agrowon
Published on
Updated on

पुणे ः पर्यटनातून रोजगार निर्मितीसाठी (Employment Generation Through Tourism) जुन्नरला हिरडा प्रक्रिया उद्योगासह (Hirda Processing) बिबट्या सफारीला (Bibtya Safari) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंजुरी दिली आहे. वढू-तुळापूर (ता. शिरूर) येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानस्थळाचे नाव ग्रामस्थांच्या मागणीनुसार पूर्वीप्रमाणेच ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधिस्थळ’ करण्यासही अनुमती देण्यात आली आहे.

Bibat Safari
Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात पाच पशुधनाचा मृत्यू

शिरूर लोकसभा मतदार संघातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात नुकतीच (ता.१५) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती. यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, माजी आमदार शरद सोनवणे यांच्यासह मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, वित्त विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. अनुपकुमार यादव, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, सचिव शैला ए. उपस्थित होते.

या वेळी वढू-तुळापूर येथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानस्थळाचे नाव पूर्वीप्रमाणेच 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधिस्थळ' करण्यास मान्यता दिली. राजगुरुनगर (ता. खेड) पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचे ज्या जागेवर भूमिपूजन झाले आहे, त्याच ठिकाणी हे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Bibat Safari
Leopard Safari : बिबट्या सफारी जागेबाबत संभ्रम

तर, खानापूर (ता.जुन्नर) येथे हिरडा प्रक्रिया उद्योग कार्यान्वित करण्यासाठी विशेष योजना तयार केल्यास हजारो कुटुंबीयांना रोजगार मिळेल, असे सांगून हिरडा या औषधी वनस्पतीचे उत्पादन करणाऱ्या श्री कुकडेश्‍वर आदिवासी हिरडा सहकारी उत्पादक संस्थेचे थकीत कर्ज भरण्यासाठी २ कोटी रक्कम विशेष बाब म्हणून देण्यासाठी बैठकीत प्रस्ताव आणण्याचे निर्देश या वेळी दिले.

आंबेगव्हाण येथे बिबट सफारी प्रकल्प

आंबेगव्हाण (ता. जुन्नर) हे स्थळ बिबट सफारीसाठी अनुकूल असून, जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा सविस्तर आराखडा तयार करावा, असे निर्देश देतानाच सुमारे साडेसहाशे हेक्टर क्षेत्रापैकी शंभर ते दीडशे हेक्टर क्षेत्रावर आंबेगव्हाण येथे बिबट सफारी प्रकल्प साकारणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com