Manikrao Kokate Agrowon
ॲग्रो विशेष

Manikrao Kokate: संपावर जाणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे

Agricultural Assistants Strike: शासनाने कृषी सहायकांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही अधिकारी, कर्मचारी संपावर जाणार असतील, तर त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई केली जाईल.

मुकूंद पिंगळे

Nashik News: शासनाने कृषी सहायकांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही अधिकारी, कर्मचारी संपावर जाणार असतील, तर त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई केली जाईल. संपावर गेलेले कर्मचारी चार दिवसांत जर हजर झाले नाहीत, तर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

‘बटन दाबले आणि काम झाले’ अशी कुठलीही पद्धत नसते. त्यामुळे थोडा वेळ आश्वासन पूर्तीसाठी जाणार आहे. सरकार सकारात्मक आहे. तरीही तुम्ही शेतकऱ्यांना वेठीस का धरता, असा संतप्त सवाल कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कृषी सहायकांच्या भूमिकेवर उपस्थित केला.

याबाबत बोलताना कोकाटे म्हणाले, की येत्या चार-आठ दिवसांत त्याबाबतचा निर्णय होणार आहे. शब्द दिल्यानंतर संपावर जाण्याचे काही कारण नव्हते. कारण प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. दोन-चार दिवसांत संप मागे घेतला नाही तर आयुक्तांना कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना केल्या आहेत.

‘गरज पडल्यास आम्ही कंत्राटी लोक भरू’

‘‘आमचा शेतकरी हुशार आहे, तो या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर बसलेला नाही. तरीही शेतकऱ्यांची अडचण होणार नाही ही सरकारची जबाबदारी आहे. गरज पडल्यास आम्ही कंत्राटी लोक भरू, मात्र अडचण येऊन देणार नाही,’’ असे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले.

मात्र कृषी सहायक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे क्षेत्रीय पातळीवर नियोजन नेमके कसे होणार, कृषी सहायक कायदेशीर कारवाईच्या इशाऱ्याला गांभीर्याने घेणार का, हे पाहणे अपेक्षित आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

SCROLL FOR NEXT