Nashik APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik APMC : नाशिक बाजार समितीत सभापतींच्या विरोधात अविश्‍वास ठराव मंजूर

APMC News ; नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या विरोधात दखल करण्यात आलेला अविश्‍वास ठराव मंगळवारी (ता. ११) मंजूर करण्यात आला आहे.

Team Agrowon

Nashik News : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या विरोधात दखल करण्यात आलेला अविश्‍वास ठराव मंगळवारी (ता. ११) मंजूर करण्यात आला आहे. नवीन सभापती निगडीपर्यंत बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर यांची प्रभारी सभापतिपदी निवड करण्यात आली आहे.

सभापती पिंगळे हे नाशिक बाजार समिती कामकाजात मनमानी पद्धतीने कामकाज करत असल्याच्या आरोप संचालकांचा होता. विशेष म्हणजे पिंगळे यांच्या गटातून निवडून आलेले ९ सदस्य विरोधात गेले. त्यामुळे कट्टर विरोधक असलेले माजी सभापती शिवाजी चुंभळे यांचे ६ व पिंगळे गटातून आलेले ९ अशा १५ संचालकांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे सोमवारी (ता. ३) अविश्‍वास ठराव दाखल केला होता.

त्यानंतर मंगळवारी बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीत प्राधिकृत अधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली व बाजार समितीचे सचिव प्रकाश घोलप यांच्या उपस्थितीत विशेष सभा पार पडली. यात १८ पैकी ३ संचालक अनुक्रमे देविदास पिंगळे, नलिनी कड आणि उत्तम खांडबहाले गैरहजर होते.

१५ संचालकांनी मतदानात अविश्‍वास ठरावाच्या बाजूने हात उंच करून मतदान केले. त्यानुसार हा ठराव डॉ. मंगरुळे यांनी मंजूर करून, ठरावाची प्रत जिल्हाधिकारी आणि उपनिबंधक कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे. आता सभापती कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहेत. नवीन सभापती निगडीपर्यंत उपसभापती विनायक माळेकर यांची प्रभारी सभापतिपदी निवड करण्यात आली आहे.

पिंगळे यांना धक्का देत सत्तांतर ...

अविश्‍वास ठराव दाखल केल्यानंतर १० संचालक सहलीसाठी परदेशात पाठवले होते. ते सोमवारी सायंकाळी नाशिकमध्ये परतले. तर काही देवदर्शनासाठी गेलेले होते. शिवाजी चुंभळे यांचा नुकताच भाजपमध्ये प्रवेश झाला. त्यानंतर भाजपच्या मदतीने चुंभळे यांनी बाजार समितीमध्ये पिंगळे यांना धक्का देत सत्तांतर घडले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dry Spell After Sowing: पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास काय कराल?

Livestock Breeding Policy: महाराष्ट्रातील पशुधन प्रजनन धोरण : क्षेत्रीय आव्हाने आणि उपाययोजना

Soil Testing Technology: सेन्सर-आधारित मृदा आरोग्य परीक्षण

Cotton Cultivation Techniques: कापूस उत्पादनवाढीसाठी सघन लागवड पद्धत

Agri Innovation: कृषी उद्योजकांनी ज्ञान, संशोधनाचा विस्तार करावा

SCROLL FOR NEXT