
Nashik News : शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पैशांच्या सुरक्षिततेसाठी बाजार समितीच्या अधिकृत बाजार आवारांवरच शेतीमाल विक्रीस आणावा. बाजार समितीमुळे शेतकऱ्यांच्या पैशास सुरक्षिततेची हमी मिळते, असे आवाहन लासलगाव बाजार समितीचे सदस्य छबूराव जाधव यांनी केले.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नैताळे व मानोरी खुर्द येथील द्राक्षमणी लिलाव सुरू करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी बाजार समितीचे सदस्य भीमराज काळे, राजेंद्र बोरगुडे, सदस्य सचिव नरेंद्र वाढवणे, मानोरी खुर्द सोसायटीचे अध्यक्ष सोपान संभेराव,ग्रामपंचायतीचे सदस्य संदीप संभेराव, गोरक्षनाथ संभेराव, रामदास वावधाने, आत्माराम संभेराव, दशरथ वावधाने, अक्षय वावधाने, बाजीराव वावधाने, सचिन वावधाने, प्रमोद संभेराव, योगेश संभेराव, विनायक शिंदे, जयंत लोहारकर, अशोक खताळे, दत्तात्रय भवर, आण्णासाहेब बोरगुडे, सहसचिव प्रकाश कुमावत, लेखापाल पांडुरंग खैरे, सर्व लिलाव प्रमुख काकासाहेब जगताप, पंकज होळकर, द्राक्षमणी खरेदीदार बापू धरम, विष्णुपंत गायकर आदी उपस्थित होते.
निफाड तालुक्यात द्राक्ष काढणी हंगाम सुरू झाला असून द्राक्षांच्या पॅकींगनंतर उरणाऱ्या द्राक्षमण्यांना योग्य बाजारभाव मिळणेसाठी बाजार समितीने कार्यक्षेत्रात उगांव, खानगांव नजीक, नैताळे व मानोरी खुर्द या ठिकाणी खरेदी-विक्री केंद्र सुरू केले आहे.
प्रारंभी जाधव यांचेसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते द्राक्षमणी क्रेटस विधीवत पूजन करण्यात आले. नैताळे येथे मुहूर्तावर समाधान जाधव यांचा द्राक्षमणी प्रतिकिलो ३२ रुपये दराने विक्री झाला. सायंकाळपर्यंत११६ क्रेट आवक झाली.
त्यास किमान ६,कमाल ३२ तर सरासरी २२ रुपये प्रतिकिलो दर मिळाला.तसेच मानोरी खुर्द येथे मुहूर्तावर राधाकिसन आवारे यांचा द्राक्षमणी प्रतिकिलो ५१ रुपये दराने विक्री झाला.सायंकाळपर्यंत १०५ क्रेट आवक झाली. त्यास किमान ४ , कमाल4 ६१ तर सरासरी २१ रुपये दर मिळाला.
मानोरी खुर्द येथे कांदा लिलाव सुरू करण्याची मागणी
प्रसंगी मानोरी खुर्द सोसायटीचे अध्यक्ष व सदस्य तसेच भरवस (मानोरी खुर्द) ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य आणि मानोरी खुर्द व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बाजार समितीच्या मानोरी खुर्द(फाटा) येथील खरेदी-विक्री केंद्रावर लवकरात लवकर कांदा लिलाव सुरू करावे या आशयाचे निवेदन बाजार समितीचे सदस्य भीमराज काळे व सदस्य सचिव नरेंद्र वाढवणे यांचेकडे दिले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.