Book Publication Agrowon
ॲग्रो विशेष

Water Management : हा तर सहकारी पाणी वापर संस्थांचा संक्षिप्त इतिहासच

Department of Water Resources : जलसंपदा विभागात नोकरीला असताना इंजिनिअर लक्ष्मीकांत वाघावकार यांनी धरण कालव्याचे बांधकाम तसेच जलव्यवस्थापनेच्या कामात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे.

Team Agrowon

Nashik News : जलसंपदा विभागात नोकरीला असताना इंजिनिअर लक्ष्मीकांत वाघावकार यांनी धरण कालव्याचे बांधकाम तसेच जलव्यवस्थापनेच्या कामात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. त्या समृद्ध अनुभवांचे आणि तांत्रिक तपशिलांचे हे लेख त्यांनी संकलित करून पुस्तकात सोप्या व सहज शैलीत मांडले आहेत.

हे पुस्तक म्हणजे सहकारी पाणी वापर संस्थांच्या विषयी केलेले काम, त्याचे स्वरूप व्याप्ती आणि अनुषंगिक माहिती म्हणजे सहकारी पाणी वापर संस्थांचा संक्षिप्त इतिहासच, असे म्हणता येईल, असे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे लाभ क्षेत्र विकास सचिव डॉ. संजय बेलसरे यांनी केले.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त शाखा अभियंता व समाज परिवर्तन केंद्राचे विश्वस्त इंजिनिअर लक्ष्मीकांत वाघावकर यांनी लिहिलेल्या ‘सहज आठवलं’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (ता. २१) डॉ. बेलसरे यांच्या हस्ते महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था(मेरी) येथील नगरकर सभागृहात करण्यात आले.

त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी कार्यकारी संचालक राजेंद्र शुक्ल, सेवानिवृत्त मुख्य अभियंता व साहित्यिक इंजिनिअर विलास शेळके, छाया देवांग, वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेचे संचालक शहाजी सोमवंशी, प्रवीण जोंधळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. बेलसरे म्हणाले, की प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी वापर संस्थांचे काम उभे राहत असताना शेतकऱ्यांना सोबत घेऊन वाघावकर यांनी आदर्श पद्धतीने कामकाज केले. त्यामुळे अनेकांच्या मदतीने येथे पाणी वापर संस्थांची चळवळ सक्षम झालेली दिसते.

पाणी वापर संस्थेचे प्रणेते समाज परिवर्तन केंद्राचे संस्थापक स्वातंत्र्यसैनिक व माजी आमदार स्व. वसंत (बापू) उपाध्ये, स्व. भरतभाऊ कावळे, शहाजी सोमवंशी, रामनाथ वाबळे, मुरलीधर अकर, राजाभाऊ कुलकर्णी आणि वाघावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काम केले. त्यांचे पाणी संस्था सक्षमीकरणाचे प्रयत्न, पाठपुरावा, परिश्रम, पुरस्कार, सद्यःस्थितीची माहिती यात विस्ताराने वाचावयास मिळते, असे त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT