Agrowon
ॲग्रो विशेष

Salam Kisan Drone: शेतकऱ्यांसाठी सलाम किसानची भाडेतत्वावर ड्रोन सुविधेचा प्रारंभ

कमी खर्चात शेतकऱ्यांना परवडेल अशी सुविधा सलाम किसान उपलब्ध करून देत आहे. ड्रोनमुळे पाण्याचा अतिरिक्त वापर टाळतो येतो. तसेच किडनाशकांचा वापरही २० ते ३० टक्के कमी होतो.

Team Agrowon

शेतकऱ्यांना फवारणीसाठी मदत व्हावी, या उद्देशाने चंद्रपुर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सलाम किसानने भाडे तत्वावर ड्रोन सेवा सुरू केली आहे. सलाम किसानच्या माध्यमातून फवारणीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना भाडे तत्वावर ड्रोन देण्यात येणार आहे.

या सेवेचं उद्घाटन स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित वन्य भाजी महोत्सव २०२३ मध्ये मंत्री सुधीर मुंगटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात भारताच्या कृषी प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. त्यांच्यासोबत सलाम किसानच्या संस्थापक आणि सीईओ धनश्री मानधनी, सीईओ अक्षय खोब्रागडे, अॅग्री-ऑपरेशनल मॅनेजर परेश कुल्लरकर आणि ड्रोन पायलट राज सिडाम व अमोल कोहरे उपस्थित होते.

“सामान्यतः, पारंपारिक पंप फवारणीमध्ये १००-१२० लिटर पाणी प्रति एकर वापरले जाते. पण ड्रोन फवारणी १० लिटर पाण्यात एकर क्षेत्रावर फवारणी करते. पारंपारिक फवारणी वेळखाऊ असते आणि त्यासाठी अंगमेहनतीची गरज असते, तर ड्रोन फवारणीसाठी फक्त ७ मिनिटे लागतात. ड्रोन सेवा शेतकऱ्यांसाठी सुलभ करून, आम्ही निविष्ठा खर्च कमी करण्यासोबतच कार्यक्षमता वाढविण्या आणि शेतकऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात मदत करत आहोत. मुळात, आमचा शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपनीचा फायदा करण्याचा हेतू आहे. मंत्री सुधीर मुनागंटीवार यांच्याकडून कौतुकाचे शब्द ऐकून आम्हाला आनंद झाला आहे.” असं अक्षय खोब्रागडे म्हणाले.

कमी खर्चात शेतकऱ्यांना परवडेल अशी सुविधा सलाम किसान उपलब्ध करून देत आहे. ड्रोनमुळे पाण्याचा अतिरिक्त वापर टाळतो येतो. तसेच किडनाशकांचा वापरही २० ते ३० टक्के कमी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होते. त्यामुळेच सलाम किसानने ड्रोन अत्याधुनिक ड्रोन उपलब्ध करून दिले आहेत.

शेतकरी उत्पादक कंपनीकडे शेतकरी ड्रोन फवारणीसाठी ऑर्डर देऊ शकतात. त्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनी शेतकऱ्यांच्या गरजेनुसार भाडेतत्वावर फवारणी ड्रोन उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी क्षेत्रानुसार ऑर्डर स्वीकारणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसोबतच शेतकरी उत्पादक कंपन्यांना फायदा होईल, असा दावा सलाम किसानकडून करण्यात आला आहे.

धनश्री मानधनी म्हणाल्या, “सलाम किसानमध्ये आम्ही ग्रामीण भागातील प्रश्नांवर काम करत आहोत. समाजातील तळागाळातील बदलाची अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी संस्थांमधील सहकार्य महत्त्वपूर्ण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिजनवर आमचा विश्वास आहे की, शेतकरी उत्पादक कंपन्या लहान शेतकर्‍यांना मोठी शक्ती देणार आहेत. तसेच सरकार आणि सहकार एकत्र येण्यामुळे आम्हाला विकसित भारताकडे जाता येईल. आमच्या राष्ट्रीय कृषी धोरणाचे उद्दिष्ट २०२५ पर्यंत १० हजार नवीन शेतकरी कंपनी स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामध्ये कृषी मूल्य साखळी सुधारणे आणि ग्रामीण भागातील पुरवठा वाढीस प्रोत्साहन दिले जाणार आहे. या स्वातंत्र्यदिना निमित्त शेतकरी उत्पादक कंपनीच्याच्या मदतीने ड्रोन आधारित फवारणी सेवा सुरू करत आहोत.”

या कार्यक्रमात पहिले आदिवासी ड्रोन पायलट राज सिडाम आणि अमोल कोहरे यांना कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आलं. सलाम किसानचा दूरदर्शी दृष्टीकोन महिला आणि आदिवासींच्या नेतृत्वाखालील शेतकरी उत्पादक कंपनीसह सहकार्याची आखणी केली आहे. दरम्यान, सलाम किसान डेटावर आधारित काम कृषी क्षेत्रात करत आहे. कंपनी शेतकऱ्यांना एकाच जागी सर्वसुविधा उपलब्ध करून देत आहे. त्यामध्ये शेतकर्‍यांना पेरणीपूर्वीपासून काढणीपर्यंत कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित उपाययोजना देत आहे. त्यामध्ये पीक नियोजन कॅलेंडर, भाडे तत्वावर शेती उपकरणे, ड्रोन भाड्याने सेवा, साठवण सुविधा आणि उत्पादन बाजारपेठेची माहिती यासारख्या सुविधा देत आहे. अवघ्या ७ महिन्यांत, त्यांनी भारतातील ७ हजार गावांमधील २२ हजार शेतकर्‍यांशी जोडलं गेलं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT