Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Latur DCC Bank : लातूर जिल्हा बँकेची कर्जवसुलीत आघाडी

Loan Recovery 2025 : . मार्चअखेर ८९.०५ टक्के कर्जवसुली करत यंदाही बँकेने शेतकरी सभासदांचे हित जोपासत वसुलीची परंपरा कायम ठेवल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांनी दिली.

Team Agrowon

Latur News : जिल्हा बँकात नावलौकिक असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जमाफी संदर्भातील संभ्रम व प्रतिकूल परिस्थिती असतानाही मार्चअखेर जोरदार कर्जवसुली केली आहे. कर्जवसुलीत बँकेने राज्यात आघाडी घेतली असून, प्रमुख जिल्हा बँकांच्या तुलनेत बँक वसुलीमध्ये अव्वल ठरली आहे.

मार्चअखेर ८९.०५ टक्के कर्जवसुली करत यंदाही बँकेने शेतकरी सभासदांचे हित जोपासत वसुलीची परंपरा कायम ठेवल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांनी दिली. बँकेचे ज्येष्ठ संचालक माजीमंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने यंदाही वसुलीचे मजबूत नियोजन केले.

यातूनच सरलेल्या आर्थिक वर्षात बँकेने एक हजार ७०६ कोटीपैकी मार्चअखेर एक हजार ५१९ कोटीची वसुली केली आहे. वसुलीची टक्केवारी ८९.०५ टक्के आहे. राज्यातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अकोला, संभाजीनगर या आघाडीच्या जिल्हा बँकेच्या तुलनेत लातूर जिल्हा बँकेच्या वसुलीचे प्रमाण अधिक असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

जिल्ह्यामध्ये ९८.६३ टक्के वसुली करून रेणापूर तालुक्याने पहिला, ९४.६७ टक्के वसुली करून लातूर तालुक्याने दुसरा तर ९०.०२ टक्के वसुली करून देवणी तालुक्याने तिसरा क्रमांक पटकवला आहे. इतर सर्व तालुक्याची वसुलीची टक्केवारी ८० टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

जिल्हा बँकेमार्फत पतपुरवठा असलेल्या ५८४ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी पैकी २१८ सोसायट्यांनी बँक स्तरावर शंभर टक्के वसुली देऊन वसुलीत मोठे यागदोन दिले आहे. तसेच शेतीकर्ज व्यवहार असलेल्या बँकेच्या ११० शाखांपैकी १४ शेतीकर्ज शाखांनीही बँक स्तरावर शंभर टक्के वसुलीचे उद्दिष्ट तडीस नेल्याचे देशमुख यांनी सांगितले.

सोसायटी, अधिकारी व गटसचिवांचे कौतुक

जिल्हा बँकेकडून वसुलीबाबत समाधान व्यक्त करून बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख, उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव व बँकेच्या सर्व संचालक मंडळाने समाधान व्यक्त करून विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सर्व पदाधिकारी, गटसचिव व बँकेचे अधिकारी, शाखा तपासणीस, शाखा व्यवस्थापक व सर्व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. या सर्वांमुळेच वसुलीचे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणात साध्य झाल्याचे बँकेचे अध्यक्ष देशमुख यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात संततधार

Fertilizer Mismanagement : कृषी सेवा केंद्रातील खत साठ्यात तफावत

Heavy Rain Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हाहाकार

AI In Agriculture : सांगली जिल्हा बँक ‘एआय’साठी देणार अनुदान

Agriculture Marketing : शेतीमाल मार्केटिंग साठी ‘कृषी-पणन’ने एकत्र यावे

SCROLL FOR NEXT