Market Bulletin: कापसावर दबाव वाढलासीसीआयने आजपासून कापूस खरेदी बंद केली आहे. याचा दबाव कापसाच्या भावावर दिसून आली आहे. कापसाचा भाव आज बाजारात १०० ते २०० रुपयाने कमी झाले होते. अनेक बाजारांमधील सरसरी भावही १०० रुपयांनी कमी झाले आहेत. आज बाजारात कापसाला सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारातील कापसाची आवक कमीच आहे. मात्र सीसीआयची बंद झालेली खरेदी आणि दुसरीकडे भाव कमी करून सुरु असलेली विक्री, याचा भावावर दबाव आला आहे. हा दबाव कायम राहू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणादेशातील बाजारात सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार दिसून येत आहेत. सोयाबीनला बहुतांशी बाजारात ५ हजारांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहेत. बाजारातील आवकही मागील काही दिवसांमध्ये काहीशी सुधारलेली दिसत आहे. सोयाबीनला उठावही चांगला आहे. यामुळे दरपातळी टिकून आहे. सरासरी भाव ४ हजार ९०० ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान पोचला आहे. सोयाबीनची आवक पुढील काळात आणखी कमी होण्याची शक्यता आहे. पण बाजाराचे लक्ष सरकारच्या सोयाबीन विक्रीकडे आहे. सोयाबीनचा भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Agrowon Podcast: सोयाबीन स्थिर, कापूस दबावातच, कोथिंबीर आवक मंदावली, हिरवी मिरची टिकून, खरबुजाची' आवक सुधारली.हरभरा आवक सुधारलीदेशातील बाजारात हरभरा आवक वाढली आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा या राज्यांमधील आवक वाढलेली आहे. याचा दबाव दरावर आला आहे. हरभऱ्याची आयातही वाढलेली आहे. सध्या हरभरा हमीभावापेक्षा कमी भावात विकला जात आहे. हरभऱ्याला ४ हजार ८०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. देशातील मालाची आवक आणि आयातही कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हरभऱ्याचा भाव पुढील काही आठवडे दबावातच राहू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Chana Procurement: राज्यात ७.६१ लाख टन हरभरा खरेदीला मंजुरी.पपईला वाढतेय मागणीउन्हाचा चटका वाढत असल्याने पपईला मागणी वाढत आहे. याचा आधार दराला मिळत आहे. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून पपईची आवक स्थिर आहे. तर दुसरीकडे पपईला मिळणारा उठाव चांगला आहे. यामुळे पपईचे भाव मागील दोन आठवड्यांमध्ये टिकून असल्याचे दिसत आहे. सध्या पपई गुणवत्तेप्रमाणे प्रक्विंटल सरासरी १५०० ते २ हजार रुपयाने विकली जात आहे. उन्हाचा चटका वाढत असल्याने पपईला उठाव मिळत आहे. पुढील काही दिवसांमध्ये मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच पपईची आवकही सुधारण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पपईचा बाजार स्थिर दिसू शकतो, असा अंदाज पपई व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे..मका दबावाताचदेशातील बाजारात मक्याची आवक चांगली सुरु आहे. त्यातच आयातीची शक्यता असल्याने दबाव वाढला आहे. देशातील उत्पादन यंदा वाढलेले आहे. त्याचा दबाव दरावर आधीच आलेला आहे. रब्बी हंगामातही उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मक्याचा उठाव यंदा कमी झालेला आहे. याचा दबाव भावावर आलेला आहे. सध्या मका बाजारात १६०० ते १९०० रुपयाने विकला जात आहे. पुढील काळातही मक्याची बाजारातील आवक चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरावर दबावरही कायम राहील, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.