Dam Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Latur Water Stock : लातूर जिल्ह्यात केवळ २९ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Water Storage : पावसाळ्याचे दोन महिने झाले तरी जिल्ह्यात मोठा पाऊस झालेला नाही. जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.

Team Agrowon

Latur News : लातूर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या दोन मोठ्या, आठ मध्यम व १३४ लघू अशा एकूण १४४ प्रकल्पांत सध्या २०८ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी २९.६३ इतकी आहे. पावसाळ्याचे दोन महिने झाले तरी जिल्ह्यात मोठा पाऊस झालेला नाही. जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.

जिल्ह्याच्या दृष्टीने मांजरा व निम्न तेरणा हे दोन मोठे प्रकल्प आहेत. मांजरा धरणात सध्या ५३ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. याची टक्केवारी २९.९६ इतकी आहे. निम्न तेरणा प्रकल्पात ६७.५१ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. याची टक्केवारी ७४ इतकी आहे. जिल्ह्यात आठ मध्यम प्रकल्प आहेत. सध्या या प्रकल्पांत २३.१९ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा असून, टक्केवारी १८.९९ आहे.

१३४ लघुप्रकल्पांत सध्या २०.६९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. एकूण १४४ प्रकल्पांत २०८.७७ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा असून, टक्केवारी २९.६३ आहे. जिल्ह्यात यावर्षी मेमध्ये चांगला पाऊस झाला. उन्हाळा जाणवला नाही. पण, नंतर मात्र पावसाने उघडीप दिली. जून महिना कोरडा गेला आहे.

जुलै महिन्याचे शेवटचे तीन-चार दिवस पावसाची रिपरिप राहिली. पण, जोरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. सध्या उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. त्यामुळे त्याचा प्रकल्पांवरही परिणाम होत आहे. जिल्ह्याला पावसाची गरज आहे.

लातूर जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा व त्याची टक्केवारी

प्रकल्पाचे

नाव उपयुक्त

पाणीसाठा टक्केवारी

तावरजा१.७३ ८.५२

रेणापूर ५.५९ २७.२२

व्हटी १.३० १५.७४

तिरू ०.०० ०.००

देवर्जन १.०१ ९.५४

साकोळ १.९९ १८.१८

घरणी १०.१९ ४५.३९

मसलगा १.३६ १०.०१

एकूण २३.१९ १८.९९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Supriya Sule: देशावर मोठे संकट, सर्वपक्षीय बैठक बोलवा, सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी, शेती प्रश्नांकडेही वेधले लक्ष

Tomato Harvester: टोमॅटो काढणी आता मशीनने; कमी वेळात जास्त क्षेत्राची काढणी शक्य!

MP Bhaskar Bhagre: सहकारी बँकांच्या संचालकांच्या नव्या निकषांबाबत पुनर्विचार व्हावा

IAS Kirti Kiran Pujara: महापुरुषांचे पुतळे उभारताना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा

PUM Impact Award: ‘गोविंद फाउंडेशन’चा ‘पम इम्पॅक्ट’ पुरस्काराने गौरव

SCROLL FOR NEXT