Farmer Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Disease : रब्बी ज्वारीवर ‘लष्करी’, तर हरभऱ्यावर घाटे अळी

Crop Disease Update : रब्बी ज्वारीवर व काही ठिकाणी लष्करी अळीचा, तर हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

Team Agrowon

Latur News : लातुर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय अंतर्गत येत असलेल्या पाच जिल्ह्यांतील रब्बी ज्वारीवर व काही ठिकाणी लष्करी अळीचा, तर हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. पाचही जिल्ह्यांत गहू व रब्बी ज्वारीची सर्वसाधारण क्षेत्राइतकी पेरणी झालेली नाही.

लातूर कृषी विभागाचे पाच जिल्ह्यांतील रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र १३ लाख ६३ हजार ९३० हेक्टर आहे. प्रत्यक्ष पेरणी १५ लाख ४८ हजार ९९३.८४ हेक्टरवर म्हणजे सरासरी क्षेत्राच्या ११३.५७ टक्के क्षेत्रावर झाली आहे. लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या चारही जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन पेरणी झाली आहे. तर धाराशिव जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ८७ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे.

रब्बी ज्वारी : पाच जिल्ह्यांत पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ७१ हजार ८५७ हेक्टर असून, आतापर्यंत ३ लाख ७० हजार ००४.५१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी ९९.५० टक्के आहे. पीक सध्या फुलोरा ते दाणे भरण्‍याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

गहू : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५६ हजार ५१९ हेक्टर आहे. आतापर्यंत १ लाख २४ हजार ४०३.९६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी ७९.४८ टक्के आहे. पिक सध्या पोटरी ते फुलोरा अवस्थेत आहे.

हरभरा : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ८६ हजार १२४ हेक्टर असुन आत्तापर्यंत ९ लाख ९४ हजार १६८.१९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी १२६.४६ टक्के आहे. पीक सध्या घाटे भरण्याच्या अवस्थेत असून, पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव अल्प प्रमाणात आढळून येत आहे.

करडई : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १९ हजार ५३१ हेक्टर असून, आतापर्यंत ३३ हजार ३१५.४८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी १७०.५८ टक्के आहे. पीक सध्या फुलोरा अवस्थेत आहे. पिकावर अल्प प्रमाणात मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

जिल्हानिहाय रब्बी क्षेत्र( हेक्टरमध्ये)

जिल्हा सरासरी क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी

लातूर २ लाख ८० हजार ४३९ ३ लाख ६४ हजार ४१४

धाराशिव ४ लाख ११ हजार १७२ ३ लाख ६० हजार २८६

नांदेड २ लाख २४ हजार ६३४ ३ लाख २४ हजार ०७०

परभणी २ लाख ७० हजार ७९४ २ लाख ८९ हजार ४०७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT