Chana Pest
Chana PestAgrowon

Pest Disease Crisis : बदललेल्या वातावरणामुळे पिकांवर कीड-रोगांचे संकट

Crop Protection : मागील काही दिवसांपासून अचानक ढगाळ वातावरण तयार होत असल्याने रब्बी पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचे संकट पुन्हा निर्माण झाले आहे.
Published on

Akola News : मागील काही दिवसांपासून अचानक ढगाळ वातावरण तयार होत असल्याने रब्बी पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचे संकट पुन्हा निर्माण झाले आहे. प्रामुख्याने हरभऱ्याच्या पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून केले जात आहे.

या भागात नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला होता. तेव्हा पिकांचे नुकसान झाले. त्यातून सावरत रब्बी हंगाम जोमावर असतानाच आता मागील चार ते पाच दिवसांपासून या भागात ढगाळ वातावरण बनलेले आहे. काही ठिकाणी पाऊसही झाला. अधिक प्रमाणात धुके पडत असल्याने हरभऱ्यावरील संकट वाढत आहे.

Chana Pest
Chana Pest : शिरूर अनंतपाळला हरभऱ्यावर अळीचे संकट

सध्या हे पीक दोन-तीन टप्प्यांत आहे. कुठे घाटे परिपक्व झाले. कुठे फुलोऱ्याची स्थिती आहे. तर काही भागांत पिकाची नुकतीच लागवड झालेली असून पीकवाढीची अवस्था सुरू आहे. अशातच आता ढगाळ वातावरण असल्याने आणि पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे.

मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यातून वाचलेल्या तुरीच्या पिकालाही अनेक ठिकाणी फुलांचा दुसरा बहर फुटलेला आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील तुरीचा बहर परिपक्व होऊन सोंगणीसाठी तयार आहे. एकाच पिकात दोन अवस्था असल्याने शेतकरी सोंगणी करावी की प्रतीक्षा, अशा द्विधा मनःस्थितीत आहेत.

ढगाळ वातावरणामुळे दुसऱ्या बहरातील तुरीच्या शेंगांवर अळी वाढू शकतो. एकूणच सध्याच्या वातावरणामुळे हरभरा, तुरीचे पीक संकटात सापडलेले आहे. पावसाळी वातावरणामुळे शेतकऱ्यांनी तुरीची सोंगणी सध्या थांबवलेली दिसते आहे.

Chana Pest
Chana Pest Crop Damage : घाटेअळीला कंटाळून हरभरापिकावर फिरवला रोटर

काही ठिकाणी तूर काळवंडली

दिवाळीनंतर झालेल्‍या मॉन्सूनोत्तर पावसामुळे तुरीच्या शेंगा काळ्या पडल्‍या होत्‍या. तर आता तुरीची सोंगणी सुरू झालेली असून या ढगाळ वातावरणामुळे व तुरळक पडणाऱ्या पावसामुळे सोंगणीला आलेल्‍या शेंगा नरम होऊन मालाची प्रतवारी घसरत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. लागवडीपासून ते फवारणी आणि बाजारात पोहोचेपर्यंत तुरीच्या पिकावर बराच खर्च करावा लागतो. त्‍यामुळे अपेक्षित दर न मिळाल्‍यास शेतकऱ्याची घोर निराशा होत आहे.

गव्हाची वाढ खुंटली

गव्हाला पोषक थंडी नसल्यामुळे वाढ खुंटलेली आहे. गव्हाचे पीक काही ठिकाणी वाढीच्या अवस्थेत असून पुरेशी थंडी मिळत नसल्याने फुटवे फुटण्याच्या अवस्थेला बाधा पोहचते आहे. गव्हाच्या पिकाला थंडीयुक्त वातावरण पोषक असते. थंडीमुळे ओंब्यांत दाणे भरले जातात. मात्र, ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर कमी होऊन पिकावर परिणाम होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com