Onion Auction Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Auction : दर घसरल्याने लासलगावला कांदा लिलाव बंद पाडले

Onion Market Update : शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लासलगाव बाजार समितीत पहिल्या सत्रात कांद्याचे लिलाव बंद पाडून संताप व्यक्त केला.

Team Agrowon

Nashik News : देशातील बाजारपेठांमध्ये नवीन खरीप कांद्याची आवक वाढल्याने क्विंटलमागे २००० रुपयांपर्यंत दरात घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लासलगाव बाजार समितीत पहिल्या सत्रात कांद्याचे लिलाव बंद पाडून संताप व्यक्त केला. मात्र दुपारच्या सत्रात लिलाव पूर्ववत सुरू झाले.

कांद्याची वाढलेली आवक तसेच केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लागू केलेले २० टक्के निर्यात शुल्क यामुळे कांदादराला फटका बसत आहे. लासलगाव बाजार समितीच्या कांदा बाजार आवारात गुरुवारी (ता. १९) सकाळी ८०० वाहनांतून कांद्याची आवक दाखल झाली.

या कांद्याला किमान ७०० रुपये, कमाल २५०० रुपये, तर सरासरी १७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. एका सप्ताहात सरासरी दरात क्विंटलमागे २००० रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. त्यामुळे लिलाव बंद पाडत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

या वेळी या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे (उबाठा) तालुकाप्रमुख शिवा सुराशे, संतोष पानगव्हाणे, बाळासाहेब जगताप, अभिजीत डुकरे, छावा क्रांती सेना शेतकरी आघाडी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोरख संत, शेतकरी गोरख बोराडे आदी उपस्थित होते.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Industrial Development: प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळणार

Rice Exports: फिलीपिन्स, सेनेगलला तांदूळ निर्यातीचा मार्ग मोकळा, 'अपेडा'कडून नोंदणी सुरु

Clean Milk Production: स्वच्छ दूध उत्पादनावर प्रात्यक्षिक

Local Body Elections: जिल्हा परिषदेचा बिगुल वाजला

Agriculture Exhibition: वेल्हाळेतील कृषी प्रदर्शन नागरिकांनी गजबजले

SCROLL FOR NEXT