Poultry  Agrowon
ॲग्रो विशेष

Poultry Farming : घरगुती खाद्यनिर्मितीमुळे पोल्ट्री खर्चात मोठी बचत शक्य

मुकूंद पिंगळे

शेतकरी नियोजन

कुक्कुटपालन

नाव : मनोहर नानाजी धोंडगे

गाव : गुंजाळनगर, ता. देवळा, जि. नाशिक

पक्षिसंगोपन क्षमता : ७,५०० ब्रॉयलर पक्षी.

वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर शेतीमध्ये त्यातही पूरक व्यवसाय कुक्कटपालनाला सुरुवात केली. २००४ मध्ये अवघ्या ३.५ हजार पक्षिक्षमतेने सुरू केलेल्या व्यवसायाचा टप्प्याटप्प्याने विस्तार करत आता त्यांच्या ७,५०० इतकी पक्षिक्षमता तयार झाली आहे.

सुरुवातीच्या काळात देवळा तालुक्यातील अन्य प्रयोगशील कुक्कुटपालकांचा सल्ला घेत पक्षिपालनात जम बसवला. प्रारंभी एका कंपनीसोबत करार पद्धतीने व्यवसाय केला जाई. मात्र आता स्वतः पक्ष्यांचे संगोपन करून विक्रीवर भर दिला आहे. यामुळे उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे.

(ॲग्रो विशेष)

ठळक कामकाज

वर्षभरात पाच ते सहा बॅच घेण्याचे नियोजन असते. त्यामुळे वर्षातील तिन्ही हंगामांचा बदलत्या ऋतूंचा अंदाज घेत त्यानुसार व्यवस्थापनामध्ये योग्य ते बदल केले जातात.

स्वतः विक्री करत असल्यामुळे बाजाराच्या मागणीनुसार सातत्याने लक्ष ठेवले जाते. त्यानुसार पिले व बॅचच्या प्लेसमेंटचे नियोजन केले जाते.

स्वच्छता, निर्जंतुकीकरण, खाद्य व्यवस्थापन आणि वातावरणीय बदलांनुसार कामांचे नियोजन केले जाते.

स्वतः मनोहर व पत्नी शुभांगी कामकाज पाहतात. सोबत एका मजुराची मदत घेतली जाते.

पक्षी संगोपनाचे पूर्वनियोजन

प्लेसमेंट करताना आणलेली लहान पिले तोंडाने अधिक श्वास घेतात. त्यामुळे पक्षिगृहात थंडावा टिकवून ठेवावा लागतो. त्याच प्रमाणे पिलांवरील तणाव कमी करण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांत दररोज पहिले पंधरा दिवस तुसाच्या गादीवर पाण्याचे फवारे दिवसांतून दोनदा मारले जातात.

१५ दिवसांनंतर पुढे पक्षिगृहातील तुसावर पाणी मारले जाते. छतावर दिवसभर तुषार सिंचन किंवा रेन पाइपद्वारे पाणी मारले जाते. तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यानंतर पक्षिगृहात फवाऱ्यांचा वापर केला जातो.

उन्हाचा चटका वाढल्यानंतर दिवसातून चार ते पाच वेळेस पक्षिगृहात देखरेख केली जाते. विशेषतः पक्ष्यांच्या हालचालींकडे विशेष लक्ष देऊन निरीक्षणे नोंदवली जातात.

पक्ष्यामध्ये हालचाल झाल्यानंतर उठलेले पक्षी स्वतः पाण्यापर्यंत जातात. पाणी वेळच्या वेळी प्यायले गेल्यास शरीरातील पाणीपातळी टिकून राहण्यास मदत होते. त्यांच्यावरील उन्हाचा तणाव कमी राहतो.

रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी शिफारशीनुसार औषधे दिली जातात. इलेक्ट्रॉकेअर, व्हिटॅमिन सी, ई ही. यांची मात्रा उन्हाचा तणाव कमी करण्यासाठी दिली जाते.

उन्हाळ्याच्या दिवसांत बॉयलर पक्ष्यांमध्ये राणीखेत रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रतिबंधात्मक म्हणून लसीकरण व औषधे दिली जातात.

घरगुती खाद्य निर्मिती व संतुलित पुरवठा

ब्रॉयलर पक्ष्यांच्या वाढीच्या अवस्थेत संतुलित आहार महत्वाचा असतो. त्यासाठी उन्हाळ्यात दोन वेळेस सकाळी ७ व सायंकाळी ७ अशा १२ तासांच्या फरकाने खाद्य दिले जाते. घरगुती पातळीवर सोया, मका यांच्या संतुलित वापरातून कुक्कुटखाद्य तयार केले जाते.

त्यात आवश्‍यक ते पोषक घटक आणि औषधांचे मिश्रण केले जाते. या खाद्य निर्मितीसाठी आवश्यक शेतीमालाची खरेदी सरळ शेतकऱ्यांकडून केली जाते. पोल्ट्री व्यवसायामध्ये खाद्यावर सर्वाधिक खर्च होतो. तेच स्वतः तयार करत असल्याने खर्चात मोठी बचत होते.

पाणी व्यवस्थापन

निर्जंतुक केलेले पाणीच पक्षिगृहात वापरले जाते. त्याचा सामू नियंत्रित ठेवला जातो. पक्ष्यांची वाढीची अवस्था आणि वातावरणानुसार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधे योग्य मात्रेत दिली जातात. प्रतिजैविक भुकटीही पाण्यातून दिली जाते.

पक्षी २५ दिवसांचे झाल्यानंतर दुपारच्या कडक उन्हात (दुपारी १२ ते ४ या वेळेत) खाद्य पुरवठा केला जात नाही. या वेळी पक्षी पाणी अधिक पितील आणि त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहील, या कडेलक्ष दिले जाते.

हंगामी उपाययोजना

पक्षिगृहात हवा खेळती राहणे गरजेते असते. अन्यथा, अमोनिया वायू तयार होऊन पक्षी बळी पडतात. त्यामुळे पक्षिगृहाचे पडदे वातावरणानुसार योग्य काळामध्ये उघडे ठेवले जातात. सूर्यकिरणांची तीव्रता रोखणे व तापमान नियंत्रित ठेवण्याच्या उद्देशाने करण्यासाठी शेडच्या नजीक झाडांची लागवड करण्यात आली आहे.

मागणीनुसार पक्षी पुरवठा

उन्हाळ्यात पक्षी तयार होण्यासाठी हिवाळ्याच्या तुलनेत ६ ते ७ दिवस अधिक वेळ लागतो. त्यानुसार ४८ ते ५० दिवसांची बॅच पूर्ण झाल्यानंतर पक्ष्यांचे वजन तपासून बाजारपेठेत पक्षी पाठवले जातात.

मनोहर धोंडगे, ९८६०२६७६१४ (शब्दांकन : मुकुंद पिंगळे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT