Land Record Office Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Land Record Office Kolhapur : प्रॉपर्टी कार्डवर नाव लावून देण्यासाठी मागितली लाच अन्..., कोल्हापुरातील घटना

Land Record Officer Arrested : प्रॉपर्टी कार्डवर नाव लावून देण्यासाठी त्याने लाच मागितली होती. भूमी अभिलेखच्या येथील कार्यालयातच कारवाई करण्यात आली.

sandeep Shirguppe

Bribe Case Kolhapur : आजरा येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील निवास वसंत पाटील (वय ४३, सध्या रा. सामंत कॉम्प्लेक्स, प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ, आजरा, मूळ कसबा वाळवा, ता. राधानगरी) याला सहा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. प्रॉपर्टी कार्डवर नाव लावून देण्यासाठी त्याने लाच मागितली होती. सायंकाळी चारच्या सुमारास भूमी अभिलेखच्या येथील कार्यालयातच कारवाई करण्यात आली.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कोल्हापूर (हनुमाननगर, पाचगाव रोड) येथील आहेत. त्यांच्या मातोश्रींच्या मामाला वारस नाही. त्यामुळे त्यांनी त्यांची चिमणे (ता. आजरा) येथील मिळकत तक्रारदारांच्या आईच्या नावे केली होती.

तक्रारदारांच्या आईचे निधन झाले. त्यांना मृत्यूपत्राद्वारे मिळालेल्या मिळकतीमधील प्रॉपर्टी कार्डाला वारसा हक्काने तक्रारदार यांचे तसेच त्यांचे वडील व भाऊ यांचे नावे लावायचे होते.

निमतानदार पाटीलने त्यासाठी तक्रारदाराकडे सहा हजारांची मागणी केली होती. मुदत संपूनही पाटील नावे नोंद करण्याबाबत टाळाटाळ करत होता.

तक्रारदाराचा याबाबत पाठपुरावा सुरू होता. त्यांनी याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

लाचलुचपत' विभागाने पाटील याला लाच घेताना पकडले. या विभागाचे पोलीस निरीक्षक बापू साळुंखे, सहायक निरीक्षक प्रकाश भंडारे, पोलीस नाईक सुनील घोसाळकर, संदीप काशीद, विष्णू गुरव, सचिन पाटील यांनी ही कारवाई केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT