Cashew Board Kolhapur : अखेर काजू बोर्डाच्या विभागीय कार्यालयास मंजुरी, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडकरांना यश

Divisional Cashew Board : राज्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरीपाठोपाठ घाटमाथ्यावरील चंदगड, आजरा, भुदरगडचा पश्चिम भाग, महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागात मोठ्या प्रमाणात काजूचे उत्पादन होते.
Cashew Board Kolhapur
Cashew Board Kolhapuragrowon
Published on
Updated on

Cashew Board News : राज्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरीपाठोपाठ घाटमाथ्यावरील चंदगड, आजरा, भुदरगडचा पश्चिम भाग, महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागात मोठ्या प्रमाणात काजूचे उत्पादन होते. कमी कष्टात चांगले आर्थिक उत्पन्न देणारे तसेच मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करणाऱ्या पिकाच्या लागवडीला चालना मिळण्यासाठी काजू बोर्डाला मान्यता देण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चंदगड, आजरा तालुक्यांतील काजू उत्पादक व प्रक्रिया उद्योजकांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर शासनाच्या पणन विभागाने चंदगडला काजू बोर्डाच्या विभागीय कार्यालयाला मंजुरी दिली. वाशी (मुंबई) येथे बोर्डाचे मुख्यालय आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गपाठोपाठ चंदगडमध्ये विभागीय कार्यालय होणार असल्याचा आदेश सहसचिव डॉ. सुग्रीव धपाटे यांनी काढला.

संशोधनद्वारे नवनवीन जातीची पैदास करता यावी यासाठी काजू बोर्ड स्थापन करावे, अशी मागणी चंदगड, आजरा तालुक्यांतून करण्यात येत होती. त्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता.

याबाबत चंदगड आणि आजरा तालुक्यातील लोकप्रतिनिधी, स्थानिक ग्रामपंचायतींनी सह्यांची मोहिम राबवली होती. याची दखल घेऊन मागच्या सहा महिन्यांपूर्वी मे २०२३ मध्ये शासनाने काजू बोर्डाला मान्यता दिली. याबाबत दोन तालुक्यात निधीचीही तरतूद करण्यात आली.

Cashew Board Kolhapur
Sugarcane Farmer Kolhapur : कोल्हापूरचा शेतकरी ग्रेटच! तब्बल वीस अंतरपिके घेत ऊसशेतीही केली फायदेशीर

मात्र बोर्डाचे मुख्यालय वाशी (मुंबई) येथे आणि सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात विभागीय कार्यालयांचा समावेश केला. यामुळे दोन्ही विभागीय कार्यालये कोकणात नेण्याऐवजी एक कार्यालय चंदगडला हवे होते असा सूर उमटला. याबाबत आमदार राजेश पाटील, भाजपचे शिवाजीराव पाटील यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी निवेदने पाठवली होती. त्यानुसार चंदगडला विभागीय कार्यालयाला मंजुरी मिळाली आहे.

'सकाळ'चा पाठपुरावा

चंदगड, आजरा परिसरातील काजू उद्योगाच्या वाढीसाठी 'सकाळ'ने नेहमीच सकारात्मक लिखाण केले. चंदगडला काजू बोर्ड व्हावे, या मागणीचे प्रथम वृत्त 'सकाळ'नेच प्रसिध्द केले होते. त्याच्या पाठपुराव्यातही 'सकाळ' अग्रेसर राहिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com